शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

MMRDA : ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची दलाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 5:37 AM

पैसे देणारे तयार असताना दलाली कशासाठी?; एमएमआरडीए संचालक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

नारायण जाधव मेट्रो, सी-लिंंकसह भुयारी मार्ग, उड्डाणपुलांंच्या विकास प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला पैशांची प्रचंंड गरज आहे. वर्ल्ड बँकेपासून जपानी जायका, एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडे हात पसरल्यानंतरही एमएमआडीएला ६०,१२४ कोटींची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी बाजारात अर्थपुरवठा करणाऱ्या अनेक संंस्था तयार असताना तब्बल १२० कोटी रुपये दलाली देण्याच्या बोलीवर एसबीआय कॅपिटल मार्केट लि. यांची नियुक्ती केली आहे.

या कंपनीला हे कर्ज उभारण्यासाठी व्यवहार व प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ही कंपनी विविध अर्थपुरवठादारांकडून हे कर्ज घेण्यासाठी मदत करणार आहे. मात्र, यासाठी त्यांना एकूण कर्जाच्या ०.२० टक्के शुल्क देण्यात येणार आहे. ही रक्कम १२० काेटींच्या घरात जाईल, असे एमएमआरडीएच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावावरून समाेर आले आहे. शिवाय, जे ६० हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे,  त्याचे व्याजही एमएमआरडीएला  द्यावे लागणार आहे.

सेवा व्याप्तीनुसार ही नियुक्ती केली असली, तरी ही व्याप्ती काय आणि किती असेल, हे गुलदस्तात आहे. शिवाय, जागतिक पातळीवरील वर्ल्ड बँकेपासून, जायका, एशियन डेव्हल्पमेंट बँक, एनडीबीसारख्या संस्थांकडून स्वारस्य अभिकर्ता म्हणून देकार मागवून हा व्यवहार व प्रकल्प सल्लागार नेमणे संयुक्तिक असताना थेट एसबीआय कॅपिटल मार्केट लि.ची नियुक्ती करण्याच्या हेतूबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.यासाठी हवे ६० हजार कोटींचे कर्ज

  • एमएमआरडीएकडे १,७४,९४० कोटींची कामे आहेत. यापैकी २०२०-२१ मध्ये ३२,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • मेट्रो व शिवडी-न्हाव-शेवा सी-लिंकसाठी ४२,६४७ कोटींचे कर्ज मंजूर. 
  • येत्या पाच वर्षांत आणखी १,०५,४३४ कोटींची गरज आहे. 
  • सध्या प्राधिकरणाकडे ४९,००० कोटींची जमीन व मुंबई महानगर प्रदेशातील विविध महापालिकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजापासून ७७,०४३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. 
  • सी-लिंंक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्ग, उर्वरित मेट्रो प्रकल्पांसाठी ६०,१२४ कोटींची गरज आहे. 
  • ती भागविण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट लि. १२० कोटींचे शुल्क आकारून एमएमआरडीएला मदत करणार आहे.
टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMetroमेट्रोWorld Bankवर्ल्ड बँक