सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जत तालुक्यात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी जत आणि कवठेमहांकाळ येथील ११ कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश शनिवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले. रोहयो घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून यात मोठा अपहार झाला असल्याचा प्राथमिक अहवाल आल्यानेच कामात अनियमितता असल्याचे कारण देत अकराजणांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. जत तालुक्यात ‘मनरेगा’च्या कामात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातून शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. (प्रतिनिधी)
‘मनरेगा’चे ११ कर्मचारी बडतर्फ
By admin | Published: February 06, 2017 1:56 AM