ठाणे : २००९ला सोशल मीडियाचा वापर मनसेने केला होता. तोच धागा पकडून २०१४ला भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार-प्रसार केला. भाजपाने या कामासाठी पैसे देऊन लोक ठेवले आहेत. परंतु, माझ्याकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला लगावला.गुरुवारी टीपटॉप प्लाझा येथे राज यांनी शहरातील पदाधिकाºयांची कार्यशाळा घेतली. या वेळी प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडियावर भर देण्याबाबत राज यांनी पदाधिकाºयांना सल्ला दिला. सोशल मीडियावर तुम्ही काय पोस्ट करता, यावरून तुमची इमेज ठरत असते. त्यामुळे सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना काळजी घ्या. येणाºया निवडणुकीत जसे रस्त्यावर उतरून प्रचार-प्रसार करणार तसाच सोशल मीडियावरही करा. पक्षाचे विचार, पक्षाची चांगली कामे, आंदोलने हे लोकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी सोशल मीडिया हे चांगले आणि प्रभावी माध्यम आहे, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रभागपातळीवर कार्यकर्त्यांची बांधणी कशी करावी तसेच २०१९च्या निवडणुकीला कसे सामोरे जावे, याबाबत मार्गदर्शन केले. माझ्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची फळी आहे. सोशल मीडियावर काम करणारे चांगले कार्यकर्ते आहेत, त्याचा वापर आपण का करू नये, असेही ते म्हणाले. या वेळी अमित ठाकरेही उपस्थित होते.अमितकडून कौतुककार्यशाळा पार पडल्यानंतर रामबाग येथील स्मशानभूमीसाठी मनसेने केलेल्या आंदोलनाचे कौतुक करून अमित ठाकरे यांनी मनविसे ठाणे शहराध्यक्ष संदीप पाचंगे व पुष्कर विचारे यांची पाठ थोपटली. स्थानिकांच्या प्रश्नांवर असेच काम करत राहा, असा सल्लाही अमित यांनी या वेळी दिला.
मनसेकडे सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे काम करणारे कार्यकर्ते- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:03 AM