मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या देशात सीएए-एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात आपण मोर्चा काढणार, मोर्चाला मोर्चानं उत्तर देणार अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली होती. यानंतर आता राज यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझं सीएएला समर्थन नाही. मनसेचा ९ फेब्रुवारीला निघणारा मोर्चा कायद्याच्या समर्थनार्थ नसेल, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांविरोधात असेल, असं म्हणत राज ठाकरेंनी म्हटलं आहे.मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्तीआज राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कृष्णकुंजवर बैठक घेतली. या बैठकीत राज यांनी पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं. 'मनसेचा मोर्चा सीएएच्या समर्थनार्थ नाही. तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चाच्या विरोधात आहे. सीएए आणि एनआरसीबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र समर्थन नाही,' अशी भूमिका राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. काल राज ठाकरेंनी रंगशारदा सभागृहात पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज ठाकरे अवघ्या १० मिनिटांत या बैठकीतून निघून गेले होते. यानंतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. आपली भाजपाबद्दलची यापुढची भूमिका काय असणार?, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाला आपण कडाडून विरोध केला. त्याच भाजपासोबत आपण जाणार आहोत का?, सीएए, एनआरसीबाबत आपली नेमकी भूमिका काय?, मनसे या कायद्याच्या तसंच केंद्र सरकारनं यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बाजूनं असणार का?, असा प्रश्नांचा भडिमार पदाधिकाऱ्यांनी केला होता.आपण यापूर्वी भाजपाला कडाडून विरोध केलेला असताना आता अचानक भाजपाच्या समर्थनार्थ जाणार असू, तर आपण लोकांसमोर काय युक्तिवाद करणार आहोत, असाही मुद्दा काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. यामध्ये मुख्यत्वे कल्याण-डोंबिवली व मुंबईतील काही पदाधिकारी आक्रमक होते. मात्र याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांना याबाबत स्पष्टीकरण देता आलं नव्हतं. त्यामुळे आज राज यांनी कृष्णकुंजवर बैठक घेत सीएएबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मोदी सरकारच्या CAAला मनसेचं समर्थन?; खुद्द राज ठाकरेंनीच केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 3:43 PM