मुंबई- गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात पुन्हा निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही निवडणुकांसंर्भात एक वक्तव्य केले आहे. यावरुन राज्यात जानेवारी नंतर निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आज राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात निवडणुका कधीही लागू शकतात असं वक्तव्य केले आहे. "मी आता भाषणाला उभा राहत नाही, कारण मला जानेवारीपासून भाषण द्यायचे आहे. कारण जानेवारीनंतर राज्यात निवडणुका लागतील, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे आता राज्यात निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मी 'तो' व्हिडीओ संपूर्ण पाहिला, जितेंद्र आव्हाडांना विनंती करतो की...; अजितदादांनी दिली प्रतिक्रिया
जानेवारीनंतर राज्यात नेमक्या कोणत्या निवडणुका लागणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधासभेसाठी मध्यावधी लागणार की महापालिका निवडणुका लागणार, या चर्चांना उधाण आले आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. या बैठकीत राज्यातील निवडणुका तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेसाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर अजुनही सुनावणी सुरू आहे. यापार्श्वभमिवर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मध्यावदी निवडणुकांवरुन वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणुकीवरुन विधान केले आहे, त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.