मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अचानक पुणे दौऱ्यावर गेले आहेत. राज ठाकरे यांचा पुणे दौरा नाही, त्यामुळे या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. हा दौरा नेमका कोणत्या कारणासाठी आहे, याची अजुनही माहिती समोर आलेली नाही. काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाली आहे. तसेच पक्षाच्या प्रवक्त्यांना कोणत्या विषयावर बोलायचे कोणत्या मुद्द्यावर बोलू नये याच्या सूचना देण्यात आले आहे.
काल राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि आज अचानक ते पुणे दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू आहेत. काही महिन्यात महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमिवर हा दौरा असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, काल मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी काही दिवसात निवडणुका लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, पुणे तसेच काही महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांची तयारी मनसेने सुरू केली आहे.
राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान
गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात पुन्हा निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही निवडणुकांसंर्भात एक वक्तव्य केले आहे. यावरुन राज्यात जानेवारी नंतर निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आज राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात निवडणुका कधीही लागू शकतात असं वक्तव्य केले आहे. "मी आता भाषणाला उभा राहत नाही, कारण मला जानेवारीपासून भाषण द्यायचे आहे. कारण जानेवारीनंतर राज्यात निवडणुका लागतील, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे आता राज्यात निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
जानेवारीनंतर राज्यात नेमक्या कोणत्या निवडणुका लागणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधासभेसाठी मध्यावधी लागणार की महापालिका निवडणुका लागणार, या चर्चांना उधाण आले आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. या बैठकीत राज्यातील निवडणुका तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.