मुंबई: काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) पार पडला. यात महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यात सर्वात चर्चेचे नाव होते नारायण राणेंचे(Narayan Rane). राणेंना मोदी कॅबिनेटमध्ये सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही (MNS Chief Raj Thackeray) होते. पण, शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी फोन केला असता, राणेंचा फोन नॉट रिचेबल आला. राज ठाकरेंनी काल पुण्यात बोलताना ही माहिती दिली. पण, आज नारायण राणेंचा फोन लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्याबद्दल राज ठाकरेंनी फोनवर खासदार नारायण राणेंचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आज या दोन नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. पण, या शुभेच्छांव्यतिरिक्त दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कुठलाच तपशील समोर आलेला नाही.
काय म्हणाल होते राज ठाकरे राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर होत. याचरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र त्यावेळी दोघांचाही फोन बंद होता. त्यामुळे संपर्क झाला नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन नारायण राणे यांना शुभेच्छा देईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.