मुंबई - काँग्रेसचेमनसेसोबत वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे मनसेला महाआघाडीमध्ये स्थान देणे अवघड असल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली राज्यात आकारास येत असलेल्या महाआघाडीमध्ये मनसेला स्थान मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र आता काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेच्या महाआघाडीतील प्रवेशाला ब्रेक लागल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. काँग्रेस आणि मनसेमध्ये वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे अशा पक्षाशी आघाडी करणे अवघड आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सहभागी होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ''भाजपाचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सहभागी झाले पाहिजे. असे ते म्हणाले.
मनसेला महाआघाडीत स्थान नको, काँग्रेसची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 2:25 PM