शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Gajanan Kale : "शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे... मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 2:19 PM

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यावरून मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. "छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही" असं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. याच दरम्यान मनसेने खोचक टोला लगावला आहे. 

दसरा मेळाव्यावरून मनसेनेशिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे... मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे. "शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे... मी तुझ्याकडे गर्दी करणार, तू माझ्याकडे गर्दी कर" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच शिल्लकसेना असा हॅशटॅगही वापरला आहे. 

"शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यास राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या"

गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अखेरीस शिवतीर्थावरच्या "टोमणे मेळाव्यास" राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शुभेच्छा मिळाल्या ... आता लवकरच मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा ..." असं देखील काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधीही मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यावरून निशाणा साधला आहे. 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर

शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दसऱ्या मेळाव्याचा नवा दमदार टीझर शेअर केला आहे. "एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवसेनेने याआधी देखील टीझर लाँच केला आहे. ठाकरे गटाने निष्ठेचा महासागर उसळणार असे म्हणत शिवसैनिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDasaraदसरा