देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लॉकडाऊन, संचारबंदीसारखे उपाय लागू करूनही त्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. देशातील बहूतांश भागात लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही लोक घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना मोदी काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
coronavirus : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज पुन्हा देशवासियांशी संवाद साधणार
नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. तसेच सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मीचं आभार व्यक्त करण्यासाठी दरवाजा, खिडकी, गॅलरीत 5 मिनिटं उभे राहून त्यांचे टाळ्या, थाळ्या, घंटी वाजवून त्यांना अभिवादन करू अशी साद घातली होती. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु आता टाळ्या थाळ्या नको, तर देशातील नागिकांना कसं जगवणार यावर बोला अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या की, नरेंद्र मोदी साहेब तुम्ही संवाद साधा, पण कोरोनासाठी केंद्र सरकारने किती निधी पाठवला आहे. रुग्णालय, औषधं, कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी लस, सरकारची उपाययोजना या विषयावर आता बोला असं रुपाली पाटील यांनी सांगितले आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांपैकी 12 जणांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं काहीसा दिलासा मिळाला असताना आणखी 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 5, तर अहमदनगरमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 107 वर पोहचला आहे.तसेच देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 500 वर गेली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जगातील ३५ देशांनी लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनेक देशांनी तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केली असून देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. संपर्क आणि संसर्गामुळे करोना होत असल्याने तो रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.