ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर काल जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केले.
चारकोप परिसरात काल दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुर्वै गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा संशय मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केला.