शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 7:27 PM

MPSC Exam Postponed - यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देmpsc परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचे राज्यभर पडसादराष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरलेअमित ठाकरे यांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

मुंबई : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. (MPSC Exam Postponed) अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पुण्यात हजारो विद्यार्थी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे. (mns leader amit thackeray slams maha vikas aghadi govt about mpsc exam postponed)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक १४ मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. पुणे, संभाजीनगर तसेच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा रोकडा सवाल अमित ठाकरे यांनी केला आहे. 

MPSC Exam Postponed: परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

राजकीय वातावरण तापले

अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही, अशी विचारणा करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी परीक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तसेच MPSC ची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यांसह चंद्रकांत पाटील, विजय वड्डेटीवार, नितेश राणे यांसह अनेक नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. 

परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा

एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वय निघून जाते, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यात सुरू झालेला विद्यार्थ्यांच्या विरोधाचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळत असून, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, सांगली, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम यांसारख्या अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण