गेल्या दहा-पंधरा-वीस वर्षात महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दलच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष पसरवला गेला. असा महाराष्ट्र कधी नव्हता. ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आता सुरू झाले आहे. कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले आहेत, त्याचे नाव शरद चंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं, असे म्हणत राज ठाकरे यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते यवतमळमधील राळेगाव येथे पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते.
जातीपातीच्या राजकारणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आज आम्ही महाराष्ट्रात गुंतलोय कशा मध्ये? आम्हाला गुंतवून टाकतायत कशा मध्ये? तर जातीपाती मध्ये. आज प्रत्येकाची ओळख कशामध्ये तर जातीमध्ये. जात काय? यापूर्वीही जाती होत्या. मला आता माहिती नाही, येथे व्यासपीठ माझ्यासोबत बसलेले माझे सहकारी कोणत्या जातीचे आहेत? मला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. पण स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणे हे स्वाभाविक, वर्षानुवर्षे होत आले आहे. पण गेले दहा-पंधरा-वीस वर्षात महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दलच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष पसरवला गेला. असा महाराष्ट्र कधी नव्हता."
...कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले -पुढे राज म्हणाले, "ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आत्ता सुरू झाले आहे. कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले आहेत, त्याचे नाव शरद चंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं. हा महाराष्ट्र हिंदुत्वाने जो भरावला होता, ते भरावलेलं हिंदुत्व तोडण्याचं काम जातीतून करायचं, हे त्यांनी सुरू केलं."
"हाताला काही लागणार नाही बाबानो आपल्या. या घाणेरड्या गोष्टींमध्ये तुम्ही तरी पडू नका कुणी. महाराष्ट्र तर अजिबात पडता कामा नाही. या सगळ्या जातीपातीच्या पलीकडे मला वाटते की, माझा तरुण मोठा झाला पाहिजे, माझे तरुणी मोठ्या झाल्या पाहिजे, असेही राज म्हणाले.
...यातून आमची महाराष्ट्रातील लोकांबद्दल, महाराष्ट्राच्या आपल्या भूमींबद्दलची आस्था लक्षात येते -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विकास आराखड्यासंदर्भात बोलताना राज म्हणाले, "महाराष्ट्राला माझी हाक आहे, विनंती आहे, माझी काही स्वप्न आहेत महाराष्ट्राबद्दलची, माझ्या काही कल्पना आहेत. मी जग फिरलेला माणूस आहे, 2014 ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा हा पहिला राजकीय पक्ष आहे (महाराष्ट्र नव निर्माण सेना). स्वातंत्र्यापासून आजपर्यंत, एकाही राजकीय पक्षाने या देशातले, या महाराष्ट्रातले प्रश्न कसे सुटतील, यावर आजपर्यंत कोणी काहीही बोलले नव्हते. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. यातून आमची महाराष्ट्रातील लोकांबद्दल, महाराष्ट्राच्या आपल्या भूमींबद्दलची आस्था लक्षात येते."