शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

हमारे तरीके और तेवर बदले नहीं; मनसेचं भाजपच्या 'त्या' खासदाराला रोखठोक प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 8:41 PM

राज ठाकरे यांनी माफी मागवी अशा वल्गना कोणी करु नये; मनसेकडून भाजप खासदाराला इशारा

कल्याण: उत्तर भारतीयांच्या विरोधात जी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्यापूर्वी माफी मागावी. अन्यथा त्यांना येऊ दिले जाणार नाही असा इशारा उत्तर प्रदेशातील भाजप खासदारने केले होते. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले, भाजप खासदाराने राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महासंघापुढे केलेले भाषण ऐकावे. त्यानंतर त्यांनी ही भाषा करावी. राज ठाकरे यांनी माफी मागवी अशा वल्गना कोणी करु नये. त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. हमारे तरीके और तेवर इनमे कुछ बदलाव नाही असे तगडे प्रत्युत्तर भाजप खासदाराला मनसे आमदार पाटील यांनी दिले आहे.

कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीमधील समाज मंदिराच्या भूमीपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने एका व्यंगचित्रकाराचा गळा घोटला अशी टिका केली होती. या टिकेचाही समाचार घेताना आमदार पाटील यांनी सांगितले की, संजय राऊतांना काही कामधंदे नाहीत. स्वत:चा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवला. तेव्हा आम्ही असे बोलायचे का पवार साहेबांच्या माध्यमातून एका फोटोग्राफरचा आणि पक्षाचा गळा घोटला.अक्षय तृतियेच्या दिवशी मनसे कार्यकत्र्याची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना नोटिसा बजावल्या. काहींना जिल्हा बंदी केली. यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, मनसे कार्यकर्ते पदाधिकारी हे काय अतिरेकी, गावगुंड आहेत का. त्याना तुम्ही पकडता. या प्रकरणात पोलिसांना मी दोष देणार नाही. ते त्यांचे काम करीत आहेत. मात्र कुठे तरी लोकांना अडकवून विनाकारण हा बखेडा उभा केला जात आहे. यशवंत जाधव, पाटणकर यांचा मुद्दा मागे पडावा यासाठी सामाजिक मुद्याला सरकारच जातीय स्वरुप देत आहे. त्याचा परिमाण स्वरुप हा गोंधळ सुरु आहे. पाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाली तेव्हाच सरकारने आदेश दिले असते तर आत्ता ही वेळ आली नसती. यूपीला काढले. सर्व धर्माचे काढले. या सरकारला काय अडचण आहे असा प्रति प्रश्न पाटील यांनी उपस्थीत केला आहे. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे