एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाळी करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. दरम्यान, राज्यात भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन झालं. असं असलं तरी हा विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आहे. शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठी एकानाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. दरम्यान, यावरून मनसेचा सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
“रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणार्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.