शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

"आमदारांना अगोदर डुक्कर, गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग..," शालिनी ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 1:58 PM

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाप्रती ज्या बंडखोर आमदारांना प्रेम आहे त्यांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी दहिसर येथील निष्ठा यात्रेदरम्यान केलं होतं.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगलं होतं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. दरम्यान, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाप्रती ज्या बंडखोर आमदारांना प्रेम आहे त्यांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी दहिसर येथील निष्ठा यात्रेदरम्यान केलं. त्यानंतर शिवसेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेवर जोरदार निशाणा साधला आहे.

"बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे अशी आर्त हाक घालायची. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे. राजसाहेब ठाकरे," असं शालिनी ठाकरे म्हणाल्या. त्यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?अनेक बंडखोर आमदार सांगतायत ती आमचं ठाकरे कुटुंबाप्रती प्रेम कायम आहे. जर त्यांचं प्रेम कायम असेल त्यांनी शिवसेनेत परतावं. त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. त्यांना माफ केलं जाईल. ज्यांना तिथेच राहायचंय त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकांना सामोरं जावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे