शिंदे गटाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या भूमिकेचा समाचार घेत खऱ्या अर्थानं शिंदे गटाचा खरा चेहरा समोर आला असल्याचं म्हटलं होतं. तसंच आता पितृपक्ष सुरू होतोय आणि पितृपक्षात पितर खाली येतात असं म्हणतात. त्यामुळे बाळासाहेब खाली येतील आणि आम्हीच जिंकू, असं विधान किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री आहे. आजही जर कै.बाळासाहेबच सर्व काही करणार असतील, तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच, पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वतः नक्की काय करणार? शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार!,” असं वक्तव्य शालिनी ठाकरे यांनी केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला.