ठाणे : कामाच्या वेळेस गैरहजर राहणाऱ्या त्या २३ डॉक्टरांच्या विरोधात शहर मनसे आक्रमक झाली असून त्यांनी शुक्रवारी कळवा रुग्णालय प्रशासनाचा कारभार सुधारावा, यासाठी मोर्चा काढला होता. या वेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन रुग्णालयाच्या डीन सी. मैत्रा यांना दिले.हे रु ग्णालय अनेक समस्यांचे माहेरघर आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातही अनेक वेळा डॉक्टर या उपस्थित नसतात. येथील कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा फटकाही रुग्णांना बसतो. त्याचप्रमाणे येथे कार्यरत असणारे डॉक्टर आपल्या खाजगी रु ग्णालयात काम करत असल्याने या रुग्णालयातील रुग्णांकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब यापूर्वीच उघडकीस आली आहे.
त्या डॉक्टरांच्या विरोधात मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 3:13 AM