शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Sandeep Deshpande : "तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 10:29 AM

MNS Sandeep Deshpande And Uddhav Thackeray : ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता मनसेने खोचक टोला लगावला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला जोरदार लढा देण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न केले जात आहेत. यातच संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता मनसेने खोचक टोला लगावला आहे. "तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची" असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा "पण बुरा ना मानो होली है "आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची" असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना, २०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, हे पाहा, याबाबत आता भाकीत करणे तेवढे सोपे नाही. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीने ठरवले होते की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू. विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

शेवटी या देशातील मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येते. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतMNSमनसे