शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

Rajya Sabha Election 2022 : "संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 10:53 AM

MNS Shalini Thackeray Slams Uddhav Thackeray : मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. 

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. यानंतर आता यावरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. 

"संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राज्यसभेचे निकाल पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की, "उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात.......!!!!" असे पण संभाजीनगर सभेत सत्यच बोलला होतात...ते आज पुन्हा एकदा सर्वांना पटले असेलच....!!!!" असं शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल

"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले" असं म्हणत मनसेने हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या  निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले... विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण