ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 05 - आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच कामाला लागलेल्या विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचच आरक्षणाच्या धक्कामुळे बिथरलेल्या मनसेने आक्रमकता दाखविली आहे.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांनी रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांना खड्डे दाखविण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून दादरला आणले. मात्र दादर केळकर रोडवर दराडे यांच्या हातात, मी मुख्य अभियंता या खड्ड्यांना जबाबदार आहे, असा फलक देऊन उभे केले, अशा आंदोलनाचा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
दरम्यान, अधिकाऱ्याची ही छळवणूक संदीप देशपांडे व संतोष धुरींना चांगलीच भोवणार आहे. दराडे यांनी या दोन्ही नगरसेवकांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच. याप्रकरणाची आयुक्त अजोय मेहता यांनीही गंभीर दखल घेत या दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करता येईल का, याची चाचपणी विधी खात्याकडे केली आहे.