नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम वगळता अन्य भाजपा विरोधात असलेल्या समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.चव्हाण म्हणाले, भारिप बहुजन महासंघाने एमआयएमच्या युतीबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. भारिपचा महाआघाडीत समावेश करण्यासाठी काँग्रेसची चर्चेची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला नंतर ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राफेल प्रकरण रावसाहेब दानवे यांच्या डोक्याच्या पलीकडचे आहे. राफेल आहे की रायफल हेच दानवेंना समजत नाही, असे ते म्हणाले.
मनसे, एमआयएमविना होणार महाआघाडी : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 1:35 AM