शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 8:23 AM

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली :  महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. मनसे महायुतीत जाणार या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर कुणी कुणाबरोबर दिसल्याने आघाडी किंवा युतीचे ठरत नसते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांना शनिवारी पूर्णविराम दिला. 

राज म्हणाले, ‘विधान भवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नव्हते. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर वागतोय असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार.’ 

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने मनसेकडून चाचपणी केली जात आहे. 

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर आले होते.  शुक्रवारी कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी राज यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले.अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात. मात्र, त्यांच्यासमोर जे राजकारण सुरू आहे, ते पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही, असे राज म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या मराठा - ओबीसी वादाबाबत ते म्हणाले, ‘राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या, या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील, तर हे वाद कोणीतरी घडवतोय’, असा आरोपही त्यांनी केला.

महाराजांचे नाव न घेणाऱ्या पवारांना तुतारी शरद पवार यांच्यावर राज यांनी थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर केले.   पवारांनी महाराष्ट्रातील महापुरुष जातीपातींमध्ये विभागून टाकलेत. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला? असा टोला राज यांनी लगावला.

गायकवाडांनी हे पाऊल का उचलले, ते शोधाभाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराकडे लक्ष वेधले असता राज म्हणाले की, ‘गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईल.’

राष्ट्रीय पक्षांना देणे-घेणे नाहीमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना याबाबत काही देणे-घेणे नाही. त्यासाठी राष्ट्रीय नव्हे, प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात, असे राज म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे