मुंबई : ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे पाठविले आहेत, त्या सर्व राजीनाम्यांचा पक्षाध्यक्ष म्हणून मी स्वीकार करीत आहे, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षातील असंतुष्टांची वाट मोकळी केली. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतील दारुण पराभवानंतर मनसे नेत्यांमधील चलबिचल लपून राहिली नाही. मनसेच्या भवितव्याबाबत साशंक असणारे नेते अन्य पर्याय शोधताना दिसत आहेत. एकेकाळी राज ठाकरेंचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे प्रवीण दरेकर यांनी सर्वप्रथम पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा सादर केला. त्या पाठोपाठ मनसेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमधील नेते वसंत गीते यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. (प्रतिनिधी)
मनसेतील नाराजांचे राजीनामे अखेर मंजूर
By admin | Published: November 05, 2014 4:43 AM