शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

मनसेच्या इंजिनाला धनुष्याबाणाचे कडवे आव्हान

By admin | Published: January 30, 2017 9:51 PM

दादर, माहिम आणि धारावीचा समावेश असणा-या जी-नॉर्थ वॉर्डातील निवडणुक दंगल यंदा विशेष लक्षवेधी असणार आहे

- गौरीशंकर घाळेमुंबई : दादर, माहिम आणि धारावीचा समावेश असणा-या जी-नॉर्थ वॉर्डातील निवडणुक दंगल यंदा विशेष लक्षवेधी असणार आहे. ज्या दादरमधून शिवसेनेने मराठीच्या राजकारणाला सुरुवात केली तिथेच मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. यंदा मनसे आपल्या जागा राखणार की शिवसेना पराभवाची परतफेड करणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.मनसेच्या मराठी झंझावाताने २०१२च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी मार दिला होता. त्यातील जिव्हारी लागलेली जखम ठरली जी-नॉर्थमधील पराभव. शिवसेना भवन, शिवाजी पार्क ज्या परिसरात आहे तेथूनच शिवसेनेला हद्दपार व्हावे लागल्याची सल ‘मातोश्री’ला दिर्घकाळ सलत राहीली. एकीकडे मनसेचा झंझावात तर दुसरीकडे स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसवासी झालेले सदा सरवणकर याची जबर किंमत शिवसेनेला मोजावी लागली होती. २०१२च्या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सदा सरवणकर स्वगृही अर्थात शिवसेनेत परतले. तर गेल्यावेळी लाटेवर स्वार झालेल्या मनससमोर स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने जाणीवपूर्वक या भागातील पक्षसंघटना मजबूत केली. दूरावलेल्या शिवसैनिकांना जवळ करण्याच्या मोहिमेने येथील शाखा पुन्हा गजबजून गेल्याचे चित्र आहे. त्याच जोरावर यंदा पुन्हा भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. मनसेच्या इंजिनासमोर अनेक अडचणी आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा राज ठाकरे आणि पर्यायाने मनसेची लाट नाही. त्यातच मतदारसंघ पुर्नरचना आणि आरक्षणाचा सर्वाधिक फटका मनसे नगरसेवकांना बसला आहे. संदीप देशपांडेंसारख्या दिग्गज उमेदवारांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. प्रभाग आरक्षित झाला, पाच वर्ष जपलेला भाग,मतदार शेजारच्या प्रभागात गेला अशा अनेक अडचणी मनसेसमोर आहेत. त्यातच येथील ११ पैकी ७ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने मनसेच्या पाचपैकी चार नगरसेवकांची अडचण झाली आहे. तर धारावी, माहिम भागात मात्र शिवसेना-मनसे अशी विभागणी नसेल. येथील मिश्र वस्ती आणि बहुरंगी लढत यंदाही कायम राहील. काँग्रेस, आरपीआय, समाजवादीसह एक अपक्ष येथून विजयी ठरले होते. समाजवादीसमोर यंदा एमआयएमचे आव्हान असणार आहे. पक्षिय राजकारणापेक्षा स्थानिक घटकच येथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. जी नॉर्थ १८२ खुला,१८३ इतर मागासवर्ग महिला,१८४ खुला,१८५ खुला,१८६ इतर मागासवर्ग,१८७ खुला महिला,१८८ खुला महिला,१८९ खुला महिला,१९० इतर मागासवर्ग महिला,१९१ खुला महिला, १९२ खुला महिला प्रभाग क्रमांक १८२आरक्षण - खुला एकूण लोकसंख्या - ५२३९६अनुसूचित जाती - ११२७अनुसूचित जमाती - ५७४प्रभागाची व्याप्ती - माहिम कोळीवाडा, बाबासाहेब आंबेडकर नगर, मकरंद सोसायटीप्रभाग क्रमांक १८३आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ४९०५०अनुसूचित जाती - ८८०६अनुसूचित जमाती - ५२४प्रभागाची व्याप्ती - नेचर पार्क, धारावी आगार, नाईक नगर.प्रभाग क्रमांक १८४आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५१८०७अनुसूचित जाती - ५२९२अनुसूचित जमाती - २०५प्रभागाची व्याप्ती - लक्ष्मीबाग, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर, श्रमिक विद्यापीठप्रभाग क्रमांक - १८५आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५०३५८अनुसूचित जाती - १९०३अनुसूचित जमाती - १२५प्रभागाची व्याप्ती - एस्ट्रेला कंपनी, राजीव गांधी नगरप्रभाग क्रमांक - १८६ आरक्षण - इतर मागासर्गएकूण लोकसंख्या - ५३४४७अनुसूचित जाती - १४७६९अनुसूचित जमाती - ४८८प्रभागाची व्याप्ती - मुकूंद नगर(पूर्व), धारावी गांव(पूर्व)प्रभाग क्रमांक - १८७आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ४९९४२अनुसूचित जाती - ३०६३अनुसूचित जमाती - ३९७प्रभागाची व्याप्ती - धारावी गांव, नवरंग कंपाऊंड, शम्मी नगर.प्रभाग क्रमांक - १८८आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ६११३६अनुसूचित जाती - ६१२३अनुसूचित जमाती - ४३२प्रभागाची व्याप्ती - शेठ वाडी, आर.पी.नगर,भाटीया नगर.प्रभाग क्रमांक - १८९आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५१०७६अनुसूचित जाती - ९१३६अनुसूचित जमाती - ४६७प्रभागाची व्याप्ती - शाहु नगर, हनुमान नगर, लेबर कॅम्पप्रभाग क्रमांक - १९० आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ५४६३९अनुसूचित जाती - १२९७अनुसूचित जमाती - १८०प्रभागाची व्याप्ती - नवजीवन कॉलनी, वांजा वाडी, गीता नगर, व्हिएसएनल कॉलनी.प्रभाग क्रमांक १९१आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५६६७६अनुसूचित जाती - २०१५अनुसूचित जमाती - ९४प्रभागाची व्याप्ती - सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी सिंधी कॉलनी, शिवाजी पार्क.प्रभाग क्रमांक - १९२आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५२९१९अनुसूचित जाती - ३८४०अनुसूचित जमाती - १७८प्रभागाची व्याप्ती - दादर पश्चिम, बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रिडा केंद्र२०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारप्रभागविजयी उमेदवार प्राप्त मते पराभूत उमेदवार प्राप्त मते१७५ बोरा सुब्बरेड्डी, आरपीआय ३४३०महेंद्र शिंदे, काँग्रेस ३२०६१७६ अनुषा कदम, शिवसेना ८९३७ गंगा माने, काँग्रेस ८१४८१७७ राजेंद्र सुर्यवंशी, शिवसेना ७६७६ दिपक काले, काँग्रेस ६६७९१७८ वकील शेख, कॉंग्रेस ९३१४ भूपेंद्र महाले , शिवसेना ९२४६ १७९ ज्योत्सा परमार, समाजवादी ८०२८ सुमन कादर, काँग्रेस ५९८४ १८० विष्णू गायकवाड, अपक्ष ४४५३ प्रकाश दोंडे, काँग्रेस ३०५४१८१ श्रद्धा पाटील, मनसे ७५५४ जयश्री तारे, शिवसेना ६१८६ १८२ विरेंद्र तांडेल, मनसे ५०८८ समाधान सरवणकर, कॉंग्रेस ४८८१ १८३ मनिष चव्हाण, मनसे १२६७६ मिलिंद वैद्य, ८७६५ १८४ सुधीर जाधव, मनसे ९३५२ यशवंत विचारे, शिवसेना ६६४५ १८५ संदीप देशपांडे, मनसे १३४५३ प्रविण शेट्टे ७१९०================================एफ साऊथ योग्य उमेदवार ठरणार कळीचा मुद्दागौरीशंकर घाळेमुंबई : लालबाग, परळ, शिवडी, नायगाव आदी मराठमोळ्या भागाचा समावेश असणा-या एफ साउथ वॉर्ड ओळखला जातो तो आपल्या मराठी अस्मितेच्या राजकारणासाठी. या वॉर्डाने कायमच शिवसेनेला आपली पसंती दिली असली तरी गेल्या निवडणुकीत मनसेने चांगलीच लढत दिली होती. यंदा मात्र शिवसेना विरुद्ध मनसे अशीच लढत या भागात पाहायला मिळण्याची शक्यता असून योग्य उमेदवार हाच सर्व पक्षांसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत येथील ७ प्रभागापैकी ५ ठिकाणी शिवसेना उमेदवारांनी बाजी मारली होती. तर दोन ठिकाणी काँग्रेस उमेदवार यशस्वी ठरले होते. गेल्यावेळी लाट असूनही मनसेचा एकही उमेदवार विजयी होवू शकला नाही. विजयाने मनसेच्या इंजिनाला हुलकावणी दिली असली तरी चार जागांवर मनसेचा उमेदवारांनी दुस-या क्रमांकाची मते घेतली. तर उर्वरित तीन जागांवर मनसे उमेदवार तिस-या, चौथ्या स्थानावर होते. यंदा मनसेची अशी लाट नाही. शिवाय मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांनी म्हणावा तसा जनसंपर्क ठेवला नसल्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत यंदा येथे पाहायला मिळणार आहे. मनसेची लाट ओसरली असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणे शिवसेनेसमोर यंदा तीव्र मतविभाजनाचा धोका नसणार आहे. तर, काँग्रेसला आपल्या दोन जागा राखताना एमआयएमचा फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मतदारसंघ पुर्नरचना, महिला व अन्य आरक्षणामुळे मात्र वॉर्डातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक प्रभागात सर्व पक्षांंध्ये इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. शिवाय मातब्बर विद्यमान नगरसेवकांनी पर्यायी मतदारसंघात चाचपणी सुरु केल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे. -------------------------------------गौतम नगर, शिंदेवाडी, नायगाव, राजारामवाडी, बीडीडी चाळ, स्प्रिंग मिल कंम्पाऊंड, पोलिस कॉलनी, पोलिस कॉलनी बीपीटी कॉलनी, म्हाडा कॉलनी, बीपीसीएल वसाहत, परमानंदवाडी, शिवाजीनगर पश्चिम, रेल्वे चाळ, कृष्णनगर, विघ्नहर्ता सोसायटी, सुखकर्ता सोसायटी, केईएम रुग्णालय, मिंट कॉलनी, आंबेवाडी, लालबाग मार्केट, मेघवाडी, गणेशगल्ली, अभ्युदयनगर, काळाचौकी, जिजामाता नगर, शिवडी, भीमनगर, शिवडी किल्ला आणि क्रिकबंदर आदी परिसराचा या वॉर्डात समावेश होतो.-----------------------एफ साउथ वॉर्डात बीडीडी, नायगाव आदी चाळींच्या पुर्नविकासाचा मुद्दा महत्वाचा आहे. पुर्नविकासाबाबत राज्य सरकारने अलीकडेच घोषणा केली असल्याने शिवसेना आणि भाजपाला त्याचा काही प्रमाणात लाभ मिळेल. पुर्नविकासाचे काम प्रत्यक्ष सुरु होईपर्यंत मात्र स्थानिक आमदारांच्या निधीतूनच येथील दुरुस्ती, डागडुजीचे काम केले जाते. --------------------------काही ठिकाणी जुन्या चाळी, इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुर्नविकासाच्या मुद्दयावर बिल्डरांच्या सोयीची भूमिका घेणा-या नेत्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांनी आपल्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकल्प रखडल्याचेही उदाहरणे आहेत.--------------------------प्रभाग क्रमांक २००आरक्षण - अनुसूचित जाती महिलाएकूण लोकसंख्या - ५१४०९अनुसूचित जाती - ७६२६अनुसूचित जमाती - २२९प्रभागाची व्याप्ती- शिंदेवाडी, गौतम नगर, नायगाव, बीडीडी चाळ, राजाराम वाडी.प्रभाग क्रमांक २०१आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५२८०८अनुसूचित जाती - ४८४१अनुसूचित जमाती - ६२२प्रभागाची व्याप्ती- स्प्रिंग मिल कंपाऊंड, पोलिस कॉलनी, बीपीटी कॉलनी, म्हाडा कॉलनी. प्रभाग क्रमांक २०२आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ४९५३१अनुसूचित जाती - ३२५४अनुसूचित जमाती - २४२प्रभागाची व्याप्ती- परमानंद वाडी, शिवाजी नगर, शिवडी पश्चिम.प्रभाग क्रमांक २०३आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५२८०६अनुसूचित जाती - ३०७१अनुसूचित जमाती - २८१प्रभागाची व्याप्ती- रेल्वे चाळ, कृष्ण नगर , विघ्नहर्ता -सुखकर्ता सोसायटी. प्रभाग क्रमांक २०४आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५१३६९अनुसूचित जाती - २३०४अनुसूचित जमाती - २२०प्रभागाची व्याप्ती- केईएम रुग्णालय, मिंट कॉलनी, आंबेवाडी, लालबाग मार्केट, मेघवाडी, गणेशगल्ली. प्रभाग क्रमांक २०५ आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५४६५८अनुसूचित जाती - २३८५अनुसूचित जमाती - ५१५प्रभागाची व्याप्ती- अभ्युदय नगर, काळाचौकी, जीजामाता नगर, दाभोळकर अड्डा.प्रभाग क्रमांक २०६ आरक्षण - इतर मागासवर्गएकूण लोकसंख्या - ४७८१५अनुसूचित जाती - २३१८अनुसूचित जमाती - ४००प्रभागाची व्याप्ती- शिवडी, भिमनगर, शिवडी किल्ला, क्रि क बंदर.२०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते१९५सुनिल मोरे, काँग्रेस९२४२विलास राणे, शिवसेना६७१४१९६पल्लवी मुणगेकर,काँग्रेस६१९३नेहा खान, समाजवादी ५८५४१९७नंदकिशोर विचारे,शिवसेना ७८५७ सोनू घाडीगावकर,मनसे७२९४१९८संजय आंबोले, शिवसेना १५१५२ सुनिल बांबूलकर, मनसे ७४४२१९९हेमांगी चेंबूरकर, शिवसेना ११०९८ आंकाक्षा गावडे, मनसे १०२४०२००वैभवी चव्हाण, शिवसेना ११५१७लतिका गुरव, मनसे ९६८०२०१श्वेता राणे,शिवसेना ७००४निशा मुराई, कॉंग्रस ६८१६लास्ट अ‍ॅडीशनपावसाळ्यात तुंबणारे पाणी मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. विशेषत: हिंदमाता आणि तुंबणा-या पाण्याचे समीकरणच जुळून गेले आहे. हिंदमाता, शिवडी, काळा चौकी, जिजामाता उद्यानाजवळ पाणी तुंबल्याने वाहतुकीचा बोजवारा उडायचा. पालिकेने पंम्पिग स्टेशन बांधल्यानंतर या पाण्याचा वेळीच निचरा होत आहे. त्यामुळे हिंदमाता आदी परिसरातील पाणी तुंबण्याच्या घटना जवळपास थांबल्या आहेत. अनेक वर्षे पावसाळ्यात तुंबणा-या हिंदमाताने यंदा मुंबईकरांना दिलासा दिला. ============================एफ नॉर्थ : उत्तर भारतीय मतांसाठी भाजपा काँगेसमध्ये स्पर्धा युतीसाठी ‘एकीचे बळ’च विजयाची हमी गौरीशंकर घाळेमुंबई : एफ नॉर्थ म्हणजे पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी अशा सधन लोकवस्तीपासून जिथे नजर टाकावी तिथे झोपड्या अशा अँटॉप हिल परिसराचा समावेश असणारा वॉर्ड. वॉर्डातील प्रत्येल प्रभागाची स्वतंत्र ओळख, स्वतंत्र राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत इथे पाहायला मिळते. तोच प्रकार येथील नागरिक समस्यांचा. बहुरंगी आणि बहुढंगी अशा या वॉर्डातील छोटे-छोटे समूह स्वत:कडे राखणे प्रत्येक उमेदवारासमोरील मोठे आव्हान असणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत या वॉर्डातील चार प्रभागांवर शिवसेना, दोन ठिकाणी भाजपा, दोन जागांवर कॉंग्रेस तर बसपा आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला होता. शिवसेनेला स्वाभाविकपणे आपल्या संघटनात्मक रचनेचा इथेही फायदा होणार आहे. काही अपवाद वगळता एखादी व्यक्ती अथवा चेह-यावर शिवसेनेचे मुंबईतील राजकारण अवलंबून नाही. शाखाशाखांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पर्याय उपलब्ध असल्याने आरक्षणाचा फटका सहसा जाणवत नाही. मराठी, दक्षिण आणि उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाचे कप्पे या वॉर्डात पाहायला मिळतात. मोदी लाटेनंतर भाजपाची येथील ताकद वाढली आहे. शिवाय उत्तर भारतीय मतांवरही भाजपाची आशा आहे. मात्र, गेल्या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे गेलेल्या युतीने सहा जागांवर कब्जा केला होता. यंदा स्वबळाच्या डरकाळ्या फुटत असल्या तरी या वॉर्डात त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेस ब-याच प्रमाणात उत्तर भारतीय मतदारावर विसंबून आहे. उत्तर भारतातील राजकारणाचा थेट परिणाम येथील उत्तर भारतीय जनमानसावर होत असतो. त्यामुळे काँग्रेसला जास्तीची मेहनत करावी लागणार आहे. शिवाय हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये एमआयएममुळे फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसपा आणि रिपब्लिकन गटातील मनोज संसारे यांच्याकडे प्रत्येकी एक एक जागा आहे. त्यातील बसपाचा जागा पक्षापेक्षा उमेदवारावर अवलंबून होती. यंदा सत्ताधारी भाजपा शिवसेना त्याचा लाभ घेवू शकते. एकेकाळी शक्तीशाली असणारे मनोज संसारे काहीसे बाजूला फेकले गेल्याचे चित्र आहे. आपले वर्चस्व राखण्यासाठी त्यांना भरीच मेहनत करावी लागणार आहे. --------------------------पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी हा सधन पट्टा मधल्या काळात हेरिटेजच्या कचाट्यात सामडला होता. त्यातून कशीबशी सुटका झाली असली तरी बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे बहुतांश इमारतींच्या पुर्नविकासाचे प्रकल्प रखडले आहेत. काही ठिकाणी तर आठ वर्षापासून प्रकल्प तसाच तखडल्याने रहिवाशांच्या माथी लांबलेले विस्थापन आले आहे तर अनेक जीर्ण इमारतींच्या पर्नुविकासाठी योग्य विकासक मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. --------------------------------प्रतिक्षा नगर, संक्रमण शिबिरे आदी परिसर म्हाडाच्या नियंत्रणाखाली, कोकरी आगार परिसरातील २९ इमारती एमएमआरडीएच्या तर केंद्रीय कर्मचारी वसाहत अशा महापालिकेच्या नियंत्रणाबाहेरील क्षेत्रातील दैनंदिन नागरी सुविधांचे प्रश्न गुंतागुंतीचे बनले आहेत. स्थानिक नेत्यांना येथील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. स्थानिक आमदार आणि खासदारास विविध योजनांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोर द्यावा लागतो. ------------------आधीच अरुंद असणा-या येथील अनेक रस्त्यांवर मोनो मार्गिका आणि मोनो स्थानकांचे काम सुरु आहे. गेली पाच-सहा वर्षे येथील नागरिक मोनोच्या या धीम्या प्रकल्पामुळे वैतागली आहेत. मोनो मार्गिकेच्या मधल्या जागेत होणा-या अवैध पार्किंगमुळे एका वेळी एकच वाहन जाईल इतकीच जागा शिल्लक राहते. त्यामुळे घाईच्या वेळात क्षुल्लक कारणांनी होणारी वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. -----------------------------लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन किल्ला, सायन तलाव, गांधी मार्केट, माटुंगा पोलिस स्टेशन, सोमय्या रुग्णालय, म्युनिसिपल कामगार वसाहत, प्रतिक्षा नगर, शास्त्री नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, वडाळा आरटीओ, विजय नगर, चांदणी नगर, कोकरी आगार, सीजीएस वसाहत सेक्टर ७, नेहरुनगर, इंदिरा नगर, जीटीबी नगर, एलटीएमजी रुग्णालय वसाहत, सरदार नगर, पंजाबी कँप, काणे नगर, षण्मुखानंद हॉल, पाच उद्याने, हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, आझाद नगर, कोहिनूर मिल, शेख मिसरी दर्गा, काणे नगर साऊथ, बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क, संगम नगर, दोस्ती आर्केड, शिवशंकर नगर, गणेश नगर , कारबा मिठागर, शांती नगर, खेराप खाडी आदी भागाचा या वॉेर्डात समावेश होतो. --------------------------१७२ खुला १७३ अनुसूचित जाती१७४ खुला महिला१७५ इतर मागासवर्ग१७६ खुला१७७ खुला महिला१७८ खुला१७९ खुला१८० इतर मागासवर्ग (महिला)१८१ इतर मागासवर्ग (महिला)----------------------प्रभाग क्रमांक १७२आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५१५३५अनुसूचित जाती - २१९९अनुसूचित जमाती - ७१४प्रभागाची व्याप्ती- लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन किल्ला, सायन तलाव, गांधी मार्केट, माटुंगा पोलिस स्टेशन.प्रभाग क्रमांक १७३आरक्षण - अनुसूचित जातीएकूण लोकसंख्या - ५५५५९अनुसूचित जाती - ६३३९अनुसूचित जमाती - ४६०प्रभागाची व्याप्ती- सोमय्या रुग्णालय, म्युनिसिपल कामगार वसाहत, प्रतिक्षा नगर, शास्त्री नगरप्रभाग क्रमांक १७४आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५०४९१अनुसूचित जाती - १९००अनुसूचित जमाती - ४१०प्रभागाची व्याप्ती- वडाळा ट्रक टर्मिनस, वडाळा आरटीओ, विजय नगर, चांदणी नगरप्रभाग क्रमांक १७५आरक्षण - इतर मागासवर्ग एकूण लोकसंख्या - ५७०२३अनुसूचित जाती - ३८९८अनुसूचित जमाती - ७७७प्रभागाची व्याप्ती- कोकरी आगार, सीजीएस वसाहत सेक्टर ७, नेहरुनगर. प्रभाग क्रमांक १७६आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५३००१अनुसूचित जाती - ४७१५अनुसूचित जमाती - ४३८प्रभागाची व्याप्ती- इंदिरा नगर, जीटीबी नगर, एलटीएमजी रुग्णालय वसाहत, सरदार नगर.प्रभाग क्रमांक १७७आरक्षण - खुला महिलाएकूण लोकसंख्या - ५०६५५अनुसूचित जाती - ३०४०अनुसूचित जमाती - ४२८प्रभागाची व्याप्ती- पंजाबी कँप, काणे नगर, षण्मुखानंद हॉल, पाच उद्याने, हिंदू कॉलनी.प्रभाग क्रमांक १७८आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५०८३५अनुसूचित जाती - ३०१५अनुसूचित जमाती - २४१प्रभागाची व्याप्ती- पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, आझाद नगर, कोहिनूर मिल.प्रभाग क्रमांक १७९आरक्षण - ख़ुलाएकूण लोकसंख्या - ५७०१३अनुसूचित जाती - ३३०२अनुसूचित जमाती - ८१०प्रभागाची व्याप्ती- शेख मिसरी दर्गा, काणे नगर साऊथ, बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क.प्रभाग क्रमांक १८०आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ५१८०८अनुसूचित जाती - २६९५अनुसूचित जमाती - ६९९प्रभागाची व्याप्ती- संगम नगर, दोस्ती आर्केड, शिवशंकर नगर, गणेश नगर प्रभाग क्रमांक १८१आरक्षण - इतर मागासवर्ग महिलाएकूण लोकसंख्या - ५०१०९अनुसूचित जाती - ६५१८अनुसूचित जमाती - ८७७प्रभागाची व्याप्ती- कारबा मिठागर, शांती नगर, खेराप खाडी २०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते१६५प्रणिता वाघधरे, शिवसेना ८७४५,विद्या चाळके, मनसे ३६४२१६६ललिता यादव,काँग्रेस८२६८संजीवनी नाटे, शिवसेना ६७६५१६७राजश्री शिरवडकर,बसपा ८२४०पुष्पा कोळी,काँग्रेस ७१०७१६८तमिल सेल्वन, भाजपा ६९३६मनिकटला सिंग,काँग्रेस ५०७०१६९श्रद्धा जाधव, शिवसेना ५७४२ रवी राजा,काँग्रेस ५४३७१७०तृष्णा विश्वासराव, शिवसेना ७६९८ खातिजा शेख, काँग्रेस ७३८०१७१महंत चौबे,भाजपा२३०३नियाज वनू, राष्ट्रवादी २१२३१७२ मनोज संसारे, अपक्ष ९९७२अनिल कदम, काँग्रेस ९२२३१७३ अलका डोके, शिवसेना ७०६०ज्योती म्हात्रे, राष्ट्रवादी ५०१९ १७४ नयना शेठ, काँग्रेस ६२६२रश्मी मिरचंदानी, भाजपा ५७३४===================================एम वेस्ट वॉर्ड : सत्ताधा-यांना संधी मनसे आणि राष्ट्रवादीला पक्षांतराचा फटकागौरीशंकर घाळे मुंबई : मुलभूत नागरी समस्यांसाठी झगडणारा वॉर्ड म्हणजे एम वेस्ट वॉर्ड. पिण्याचे पाणी, नाल्यांची समस्या, शौचालयांची दुरावस्था आणि प्रदुषणाचा विळख्यातून हा वॉर्ड बाहेर पडू शकला नाही. विशेष, म्हणजे राजकारणातील बड्या नेत्यांची वस्ती आणि त्यांच्या छत्रछायेत पोसली जाणारी राजकीय फळी यामुळे राजकीय हालचाली, घडामोडी मात्र नित्याची बाब आहे. मागील पालिका निवडणुकीत एकूण ८ प्रभागांपैकी चार जागांवर काँग्रेस आणि प्रत्येकी दोन जागांवर शिवसेना आणि भाजपाने कब्जा केला होता. मात्र, मधल्या काळात पोटनिवडणुकीत एक अतिरिक्त जागा शिवसेनेकडे आली. काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरींना कंटाळून अनिल पाटणकर यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला होता. पुढे शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी पोटनिवडणुकीत ही जागा स्वत:कडे कायम राखली. इच्छुकांच्या आयाराम-गयाराम पद्धतीच्या राजकारणाचा शिवसेना आणि भाजपाला मोठा फायदा होणार आहे. काँग्रेसनेही काही भिडू आपल्या तंबूत आणण्यात यश मिळविले आहे. गेल्यावेळी शिवसेनेला दोन जागांवर आस्मान दाखविण्या-या आणि पाच जागांवर तिस-या क्रमांकाची मते घेणा-या मनसेची मात्र पुरती दैना उडाली आहे. आधीच पक्षाची अवस्था सध्या नाजूक बनली आहे त्यातच ज्यांचे थोडेफार काम आहे त्यांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. राष्ट्रवादीलाही पक्षांतराचा मोठा फटका बसला आहे. आशा मराठे यांनी अलीकडेच भाजपाचा रस्ता धरला तर लहू कांबळे यांनी शिवसेना जवळ केली. आशा मराठे यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीची या भागातील आशाच संपुष्टात आली आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचा आकार मुळातच लहान. आशा मराठे यांच्या रुपाने पक्षाने या भागात नेतृत्व निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा विस्तारही होत होता. पालिका निवडणुकीत काही पदरात पडेल अशी आशा निर्माण झालेली असतानाच पक्षांतर झाल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. मनसे आणि राष्ट्रवादीच्या या पीक्षेहाटीचा थेट फायदा सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे अनेक मुख्य लढतही याच तीन पक्षांमध्ये असणार आहे. शिवाय दलित मतदारांची मोठी संख्या या भागात असल्याने रिपब्लिकन मते कशी फिरणार आणि महायुतीत काय काय राजकारण रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिनकामी मोनोवाहतुक कोंडीवरील समस्येचा उतारा म्हणून मोनो आणि मेट्रो मुंबईत आली. त्यातील मोनोचा पहिला टप्पा या वॉर्डात असून त्याचा कोणताच लाभ होत नाही. आधीच अरुंद रस्ते आणि त्याच बिनकामी मोनोची अडचण अशी परिस्थिती येथे झाली आहे. वाशी नाका, चेंबूर नाका आणि स्टेशन परिसर कायम या कोंडीने ग्रासलेले असतात. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष या वॉर्डातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रोजच संघर्ष करावा लागतो. पालिकेने पाण्याबाबत कितीही गप्पा मारल्या तरी एक -दोन तासापेक्षा अधिक काळ येथे पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी माफियांचाही मोठा सुळसुळाट या भागात आहे. दुर्गंधी आणि प्रदुषण आरसीएफ, टाटा थर्मल, चप्पल व्यावसायिक आणि डम्पिग ग्राऊंडमुळे स्थानिक हैैराण झाले आहेत. प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत असल्याने स्थानिकांना श्वसनाचे आणि घशाच्या विकारांना सामारे जावे लागत आहे. प्रदुषणाविरोधात स्थानिकांनी अनेक तक्रारी दाखल करुनही यंत्रणा ढिम्मच आहेत. टिळक नगर, इंदिरानगर झोपडपट्टी, छेडानगर, पेस्तमनगर कॉलनी, राहूलनगर, बीएमसी कॉलनी, ज्योतीनगर, न्यू गरीब जनतानगर.पोस्टल कॉलनी, चेंबूर गावठाण, जयअंबेनगर, महादेववाडी, संतोषनगर, वसंतनगर, संभाजीनगर, चेंबूर कॉलनी, युनियन पार्क, कलेक्टर कॉलनी, अशोकनगर, म्हैसूर कॉलनी, माहूल व्हिलेज, सुमननगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क आदी भागाचा या वॉर्डात समावेश होतो. नवीन रचना१४९ खुला१५० खुला१५१ खुला१५२ अनुसूचित जाती१५३ इतर मागासवर्ग१५४ खुला१५५ अनुसूचित जातीप्रभाग क्रमांक १४९आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ४९९८३अनुसूचित जाती - ४७५०अनुसूचित जमाती - ६७३प्रभागाची व्याप्ती - टिळक नगर, इंदिरानगर झोपडपट्टी, छेडानगर, पेस्तमनगर कॉलनी.सहकार नगर, ठक्करबाप्पा कॉलनी, वत्सलबाई नाईकनगर, साईबाबा नगर.प्रभाग क्रमांक १५०आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५०३९१अनुसूचित जाती - ७६१६अनुसूचित जमाती - ३३५प्रभागाची व्याप्ती - राहूलनगर, बीएमसी कॉलनी, ज्योतीनगर, न्यू गरीब जनतानगर.प्रभाग क्रमांक १५१आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५९१६९अनुसूचित जाती - २६४५३अनुसूचित जमाती - २९६प्रभागाची व्याप्ती - सहकार नगर, ठक्करबाप्पा कॉलनी, वत्सलबाई नाईकनगर, साईबाबा नगर.प्रभाग क्रमांक १५२ आरक्षण - अनुसूचित जातीएकूण लोकसंख्या - ६०३६३अनुसूचित जाती - ११८५९अनुसूचित जमाती - ७८५प्रभागाची व्याप्ती - पोस्टल कॉलनी, चेंबूर गावठाण, जयअंबेनगर, महादेववाडी.प्रभाग क्रमांक १५३आरक्षण - इतर मागासवर्गएकूण लोकसंख्या - ६०९८१अनुसूचित जाती - ५१०९अनुसूचित जमाती - ४२८प्रभागाची व्याप्ती - संतोषनगर, वसंतनगर, संभाजीनगर.प्रभाग क्रमांक १५४आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ६२६५३अनुसूचित जाती - ५८५६अनुसूचित जमाती - ५३१प्रभागाची व्याप्ती - चेंबूर कॉलनी, युनियन पार्क, कलेक्टर कॉलनी, अशोकनगर.प्रभाग क्रमांक १५५आरक्षण - अनुसूचित जातीएकूण लोकसंख्या - ६१५३०अनुसूचित जाती - ११५५१अनुसूचित जमाती - ८४१प्रभागाची व्याप्ती - म्हैसूर कॉलनी, माहूल व्हिलेज, सुमननगर, भारत पेट्रोलियम रिफायनरी, भक्तीपार्क. २०१२ च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते१४२सीमा मेहूलकर, काँग्रेस७६१४सईदा हमीदानी, शिवसेना ६९९२१४३शंकर शिवगण, भाजपा २९०५महेंद्र नाकते, अपक्ष २३९४१४४राजश्री पालंडे, भाजपा ६२२२स्वराली शास्त्री, मनसे ४५२६१४५वंदना साबले, काँग्रेस ६९४३सरस्वती फुलवारीया, अपक्ष ३७७७१४६सुप्रदा पातरफेकर, शिवसेना८६९४नीलम डोळस, काँग्रेस ४१४६१४७अनिल पाटणकर, काँग्रेस१०२७९तुकाराम काते, शिवसेना ९९९२१४८संगिता हंडोरे, काँग्रेस ७९८३स्रेहा भालेराव, आरपीआय ३६६४१४९दीपा परब, शिवसेना ५५०४अंजली सातर्डेकर, राष्ट्रवादी५०६८========================एम इस्ट : समाजवादीला एमआयएमची चिंतास्थानिक उमेदवारांची भाऊगर्दी गौरीशंकर घाळेमुंबई : सर्व प्रकारच्या नागरी समस्यांनी वेढलेला वॉर्ड म्हणून एम-इस्टची ओळख देता येईल. आशियातील श्रीमंत महापालिकेने आपल्या कारभाराचा कितीही दिंडोरा पिटला तरी सर्व प्रकारच्या नागरी समस्या एकाच ठिकाणी पाहायच्या असतील तर एम इस्टचा फेरफटका मारायला हरकत नाही. दोन दशकाहून अधिक काळ येथील राजकारण समाजवादी पक्षा(सपा)च्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. मराठी आणि दलित वस्तीचा काही भाग सोडला तर संपूर्ण पट्टा दाट मुस्लिम लोकवस्तीचा. ओवेसी बंधुंनी मुंबईत जोर लावला असला तरी सपाने अद्याप तरी आपला गड चिरेबंदी ठेवण्यात यश मिळविले आहे. गेल्या पालिका निवडणुकीत या वॉर्डातील चार जागा सपाने जिंकल्या होत्या तर दोन जागांवर दुस-या क्रमांकाची मते मिळवली होती. स्थानिक उमेदवारांची भाऊगर्दी असताना बाहेरचा उमेदवार द्यायचा आणि त्याला जिंकून आणायचे हेच सपाचे आतापर्यंतचे राजकारण राहीले. सपा नेते आमदार अबू आझमी स्वत: या मतदारसंघासाठी बाहेरचे. यंदा मात्र स्थानिकांना उमेदवारी द्यावी ही मागणी वाढत आहे. आतापर्यंत एमआयएमला या पट्टयातील मुस्लिम वस्तीत आपले हातपाय पसरविता आले नाही. मात्र, डावलल्या गेलेल्या स्थानिकांना आपल्या झेंड्याखाली आणून एमआयएमचा ‘पतंग’ उडवायची गणिते मांडली जात आहेत.या वॉर्डात काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. तर, दोन जागी त्यांचे उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. मुस्लिम समाजातील जनाधार टिकविण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु आहे. एमआयएमचा शिरकाव झालाच तर होणा-या मतविभाजनातून काँग्रेसी पंजा सहीसलामत राहील यासाठी स्थानिक पक्षसंघटनेवर बराचसा भर असणार आहे. देवनार म्यनिसिपल कॉलनी, देवनार गाव, मंडाळा गाव, महारष्ट्र नगर आणि चिता कँप व पायली पाडा या भागात मराठी वस्तीला शिवसेनेचा आधार आहे. पालिकेतील राजकारणात एकेकाळी महत्वाची भूमिका बजावणारे आणि आता खासदार म्हणून निवडून आलेल्या राहुल शेवाळेंसमोर शिवसेनेचा आकडा वाढविण्याची जबाबदारी आहे. पंधरा पैकी तब्बल अकरा जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे एखाद-दुसरा सन्मानजनक अपवाद वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी अमक्या तमक्याची बायको वगैरे अशाच उमेदवारांची गर्दी इथे असणार आहे. त्यासाठी संबंधितांनी जोरदार मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. -------------------------------------देवनार डम्पिंग ग्राऊंडचा विषय राजकीय आखाड्यात खुप काळ चघळला गेला. सरकार दरबारीही याबाबत विविध घोषणा झाल्या. प्रत्यक्षात मात्र डम्पिंगच्या समस्या जशीची तशी आहे. दुर्गंधी आणि प्रदुषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना केवळ कागदावरच राहील्या. केवळ राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी या प्रश्नी पुढा-यांनी तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा दुसरे काही केलेले नाही. -----------------------या वॉर्डातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मानखुर्द मंडाळा, शिवाजी नगर, रफीक नगर, महाराष्ट्र नगर, ट्राँबे वगैरे भागातील पाण्याचा प्रश्न तसाच आहे. तर, सिद्धार्थ कॉलनी, गोल्फ क्लब आदी भागात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत. पाणी पुरवठ्याबाबत पालिक