शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोबाईलचे व्यसन होतेय जीवघेणे

By admin | Published: July 08, 2017 1:48 AM

आठ वर्षांचा यश एक तासापासून यू ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला होता... हातातली कामे उरकल्यावर आईचे लक्ष गेले आणि तिने हटकले.

प्रज्ञा केळकर-सिंग/लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आठ वर्षांचा यश एक तासापासून यू ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला होता... हातातली कामे उरकल्यावर आईचे लक्ष गेले आणि तिने हटकले... काही वेळाने ‘यश, आता मोबाईल ठेव हं,’ असा धमकीवजा इशाराही दिला...‘थांब गं आई,’ असे म्हणून तो पुन्हा मोबाईलमध्ये रमला... आता मात्र आईचा पारा चढला आणि तिने यशच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. यश प्रचंड संतापला, त्याने वस्तू फेकून आदळ-आपट करायला सुरुवात केली आणि ‘माझ्या मनासारखे होत नसेल, तर मला जगायचेच नाही’ असे म्हणत आपल्या खोलीत जाऊन त्याने धाडकन दार लावून घेतले. आपल्या चिमुरड्याचे विचित्र वागणे पाहून आई भांबावून गेली. आई-वडिलांनी मोबाईल हातातून काढून घेतल्याने नऊ वर्षांच्या मुलाने स्वत:चा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच हरियाणामध्ये घडली. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लाड म्हणून दिल्यानंतर मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्याची तक्रार पालकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आजकाल घराघरांत असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. दोन वर्षांच्या मुलापासून प्रत्येकाला मोबाईलचे अक्षरश: वेड लागले आहे. सतत मोबाईल हाताळण्याची सवय लागल्याने पालकांनी मोबाईल हिसकावून घेतला, तर ती गोष्ट मुलांना सहन होत नाही. मनासारखे होत नसल्याने पालकांना आत्महत्येची धमकी देण्याची मानसिकता मुलांमध्ये बळावत आहे. या परिस्थितीला मोठ्या प्रमाणात आई-वडीलच जबाबदार असून, त्यांनीच मुलांना या सवयीपासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. उदय ठकार म्हणाले, ‘‘गेल्या काही काळामध्ये चौकोनी अथवा त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना उदयाला आली आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने त्यांना मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. मुलांसाठी भरपूर खर्च करून, त्यांचे हट्ट पुरवून पालक भरपाई करण्याचा प्रयत्न करतात. हातातील कामे आटोपता यावीत आणि तोवर मुलाने शांत बसावे, म्हणून आई लहान मुलाच्या हातात मोबाईल सोपवते. हळूहळू मुलांना मोबाईलची सवय लागते. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलगा जेवत नाही, अशी तक्रार पालकांकडून केली जाते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आपणच मुलांना ही सवय लावल्याचे पालक सोयीस्करपणे विसरतात. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर जागे होतात. मुलांना मोबाईलपासून परावृत्त करणे, नात्यांचे महत्त्व पटवून देणे, मैदानी खेळांची सवय लावणे या सवयी पालकच मुलांना लावू शकतात.’’पालकांनी मोबाईल हातातून काढून घेतला, की मुलांमध्ये राग आणि तणावाची लक्षणे दिसू लागतात. मुले भयंकर चिडतात आणि विचित्र वागू लागतात. आई-बाबा आपले सर्व हट्ट पुरवतात, हे माहीत असल्याने मुले ‘इमोशनल ब्लॅकमेल’ ककू लागतात. ‘मी जेवणार नाही, बोलणार नाही’ इथपासून घरातून ‘निघून जाईन, आत्महत्या करेन’अशी धमकी देतात. अशा वेळी पालकांनी हतबल होण्यापेक्षा निग्रहाने मुलाच्या सवयींमध्ये बदल करणे, त्याला सामाजिक बांधिलकी शिकवणे, शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्यास शिकवणे आदी उपाय अवलंबणे आवश्यक असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.लहान मुलांमधील मोबाईलचे व्यसन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणतेही मूल मोबाईलचे वेड घेऊन जन्माला येत नाही. पालक त्याला या साधनाची ओळख करून देतात. मुलांनी टेक्नोसॅव्ही असले पाहिजे, असा विनाकारण बागुलबुवा केला जातो. मोबाईलशिवाय आपले काहीही अडत नाही, याची आधी पालकांना जाणीव होणे आवश्यक आहे. मुले पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे मोबाईल वापराबाबत पालकांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुले मोबाईलच्या आहारी गेली असतील, तर निग्रहाने त्यांना परावृत्त करायला हवे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व-विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. - डॉ. भूषण शुक्ला, बालमानसरोगतज्ज्ञ