कल्याण: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण मलंगगड पट्टीतील गावाकरीता फिरता दवाखान्याचे लोकार्पण शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी कल्याण लोकसभा मतदार संघाकरीता आणखीन पाच फिरते दवाखाने दिले जातील असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
नेवाळी नाक्यावर फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्यात औषध गोळ्य़ा, तपासणी, ऑक्सजीनसह डॉक्टर नर्सेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ही रुग्णवाहिका नसून लहानसे हॉस्पीटलच आहे. त्याचा लाभ मलंगपट्टीतील ग्रामीण भागाला होणार आहे.
नळ पाणी योजना मंजूर करणार
खासदार शिंदे यांनी सांगितले की, मलंग पट्टीतील चेक डॅप दुरुस्तीचे काम केले आहे. त्याचबरोबर काही तलाव आहेत. त्यांचे गाळ काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे भूजलस्तर सुधारत आहे. या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी कायम स्वरुपी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
क्लस्टर फार्मिगचे धोरण तयार करणार
कल्याण मलंग पट्टीतील गावात भातशेती केली जात आहे. त्याचबरोबर हंगामी शेती केली जात आहे. भेंडी, कारली, दुधी आदी फळभाज्यांची पिके घेतली जात आहे. त्यांच्या नगदी पिकांना बाजारात योग्य भाव मिळावा यासाठी या भागात क्लस्टर फार्मिगचे धोरण जाहिर करावे. क्लस्टर फार्मिच्या माध्यमातून या भागातील नगदी पिकांना चांगला भाव आणि बाजारपेठ उपलब्ध होईल. क्लस्टर फार्मिगचे धोधर तयार करण्यात यावे याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांकडे मागणी केली असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.