ऑनलाइन लोकमत
औसा ( लातूर), दि. ३ - चुलत्याचा मोबाईल का आणलास ? तुला सारखा मोबाईल कशाला लागतो...? असे म्हणून वडिलांनी रागावल्यान १४ वर्षीय मुलाने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वा़ च्या सुमारास औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालय प्रकल्पाजवळ घडली आहे़.
अरुण प्रकाश आडे (१४, रा़ हासेगाव तांडा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़.
याबाबत अधिक वृत्त असे की, हासेगाव येथील सेवालयात प्रकाश आडे (रा़ हासेगाव तांडा) बे आपल्या कुटुंबासमवेत पूर्णवेळ सेवक म्हणून काम करतात. त्यांच्यासवेत पत्नी सुमनाबाई आणि त्यांची अरुण आणि ज्ञानेश्वर ही दोन मुलेही तिथेच राहत होतू. मंगळवारी रात्री प्रकाश आडे व त्यांचे कुटुंबिय जवळच्याच चुलत्याच्या घरी जेवणासाठी गेले होते़ . जेवण करुन सेवालयात येताना अरुण याने चुलते रणजित आडे यांचा मोबाईल घेऊन आला होता़ त्यामुळे वडिलांनी ‘तुला मोबाईलचे वेड लागले आहे़ तू चुलत्याचा मोबाईल का आणलास’ असे म्हटले़ . हा राग मनात धरुन अरुण याने बुधवारी सकाळी ८ वा़ च्या सुमारास सेवालय प्रकल्पातल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली़.
ब्रश करणारा अरुण कुठेही दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला असता शेततळ्यात त्याचे प्रत सापडल्याने सगळा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती औसा पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा सुरु केला असल्याचे सेवालयाचे प्रमुख रवि बापटले यांनी सांगितले़.