मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर हा तलावही भरून वाहू लागला आहे. सोमवारी रात्री १०.२८ वाजता मोडक सागर भरल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडावे लागले. मोडक सागरमधून मुंबईला दररोज ५५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. सात तलावांपैकी मोडक सागर अत्यंत महत्त्वाचा तलाव आहे. मोडक सागर भरल्यानंतर आता तानसा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. अपुऱ्या पावसामुळे गेल्या आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरू होती. १९ जुलै रोजी तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात मागे घेण्यात आली. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची आवश्यकता असते. सोमवारपर्यंत एकूण १० लाख ३१ हजार ६८० दशलक्ष लिटक पाणीसाठा झाला आहे. मागच्या वर्षी या काळात तो आठ लाख ३४ हजार ९९२ दशलक्ष लिटर होता. (प्रतिनिधी)
मोडक सागर तलावही झाला ‘ओव्हर फ्लो’
By admin | Published: August 02, 2016 6:13 AM