२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.
टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत ७ ऑगस्ट २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.
‘मोडी’ मोडीत गेली, ‘लेखन- यंत्र’ विस्मृतीत गेलं!
चांदीसारख्या धातूचा वर्ख काढता येतो.
सोन्यासारख्या किं वा पितळासारख्या धातूंचे पातळसे
पत्रे काढता येतात. लोखंडाच्या सळ्या बनविता येतात.
हे तर काहीच नाही. दोन धातूंच्या क मी-जास्त
मिश्रणातून संयुक्त धातूपासून कोणकोणती कामं
क रवून घेता येतात, याला सुमारच नाही. मानवी
जीवनात धातूंच्या उपयोगाची अक्षरश: असंख्य
उदाहरणं देता येतात.
छपाईची म्हणजे कागदावर छापा उमटविण्याची
क ला साध्य होण्यापूर्वी भूजर्पत्रंवर अणकु चीदार
वस्तूनं लिहिलं जाई. ग्रंथाच्या ‘प्रती’ दुर्लभ होत्या.
क ॉप्या क रणार कोण? मग क ॉप्याबहाद्दरही तयार
होऊ लागले. चांगलं हस्ताक्षर असलेल्यांना एक
व्यवसायच मिळाला. त्यांना ‘स्क्र ाईब्ज’ म्हणत एका
ग्रंथाच्या नक ला क रू न देणा:यांची मिळक तही बरीच
होई; पण ते तरी कि ती नक ला उतरविणार? त्याही
भूजर्पत्रंवर! दहा, पंधरा, वीस, पंचवीस..कि ती? पण
एखाद्या ग्रंथाला त्याहूनही अधिक मागणी असेल, तर
काय क रायचं? मग कोणीतरी नामी क्लृप्ती लढवली.
क मी टणक असलेल्या सपाट दगडावर अक्षरं जर
उलटी कोरली आणि त्या कोरलेल्या दगडावर
शाईसारखा काळ्या रंगाचा पदार्थ पसरला आणि तो
वाळण्यापूर्वीच एखाद्या सौम्य रंगाच्या किं वा पांढ:या
कापडावर तो उमटविला, तर अधिक नक ला काढता
येतील. कापड, लाकू ड वगैरेपासून ‘कागद’ तयार
क रण्याची क ला चिन्यांनी साध्य के ल्यानंतर शिळेवर
कोरू न तयार के लेल्या ‘पृष्ठां’चे छापे कागदावर
उमटविले गेले. त्यायोगे ग्रंथांच्या प्रतींची संख्या
वाढली. ज्ञानप्रसारास मदत होऊ लागली. या प्रक्रि येचं
वर्णन शिळाछाप’; शिळाप्रेस’ म्हणजे असं लीथोग्राफ
होऊ लागलं. शिळाछापाची पुस्तकं ‘हस्तलिखित’
ग्रंथांपेक्षा अधिक प्रतींची होऊ लागली, यात नवल
नव्हतं.
शिळाछापाच्या तंत्रनं आणखी एक क ौशल्य
साधलं. चित्रं चितारणारे आपल्या चित्रच्या नक ला तरी
कि ती क रू शक तील? मग त्या क शा क रायच्या?
सपाट दगडावर फ ार सूक्ष्मात चित्रं काढणं अशक्यच;
पण सुरु वातीला खाशा लाक डावर आणि नंतर
पत्र्यावर चित्र उमटवता आलं, तर छाप पाडता येतील
क ी नाही? मग ‘वूडक ट्स’ म्हणजे लाक डावर कोरीव
काम क रू न त्याचे कागदावर छापे उमटवता येऊ
लागले. एवढंच काय, ‘एचिंग्ज’ म्हणजे पत्र्यावर चित्र
उमटवून त्याची चित्रं कागदावर उमटविण्याची सोय
झाली. त्या ‘एचिंग्ज’ अधिकाधिक सुबक , सुडौल
आणि बारीक सारीक क लात्मक तपशील देणारी ठरू
लागली. एकोणिसाव्या शतकात ही क ला मोठीच प्रगती
क रू न होती. उत्कृ ष्ट क लेचे नमुने तयार क रण्याच्या
कै फ ात अनेक क लावंतांनी आपली दृष्टी क्षीण क रू न
घेतली. आता ‘एन्ग्रेव्हर्स’ ही जमातच नाहीशी झाली
आहे. साहजिक च ‘एन्ग्रेव्हिंग’ ही क लासुद्धा अस्तंगत
झाल्यात जमा आहे. जुन्या ‘एन्ग्रेव्हिंग’चं नयनसुख
घेण्यातच धन्यता मानावी लागत आहे.
चीनमध्ये ‘कागद-निर्मिती’चा शोध
लागल्यापासून कागदाचा प्रसार जगभर होणं
अपेक्षितच होतं, कारण तो शोधच छपाईच्या दृष्टीने
क्र ांतिकारक होता. लगद्यापासून कागद निर्मितीच्या
प्रक्रि येत सुधारणा होत होत कि ती प्रकारचे कागद
निर्माण व्हावेत, याला सुमार राहिला नाही. ‘हॅँडमेड
पेपर’ हा प्रकारसुद्धा महागडा ठरावा. इतक्या प्रकारचे
आणि आकाराचे कागद यंत्रच्या साह्यानं बनू लागले.
त्यावर शिळाछापानं ग्रंथ तयार होऊ लागले. नंतर तर
छपाईतही मानवी हातांची जागा यंत्रनं घेतली.
लिपीतील मूळाक्षरांचे सुटेसुटे ‘खिळे (=टाइप)’
जुळवून अक्षरं, वाक्यं बनवता येतात, हे ध्यानात
येईर्पयत शिळाछपाई सुरू राहिली. नाना
फ डणवीसांनी प्रयोगादाखल पितळी पत्रे पृष्ठे म्हणून
वापरू न त्या पत्र्यांवर भगवद्गीता ‘कोरू न’ गं्रथराज
तयार के ला होता म्हणो! सदाशिव काशीनाथ छत्र्यांची
शिळाछपाईतील इसापनीती त्यावेळच्या मुला-मुलींच्या
कि ती पिढय़ांनी आनंदानं वाचली असेल. 1857 मध्ये
स्थापन झालेल्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या पूर्वी शाळांत
शिक वली जाणारी टेक्स्ट बुकं ही खिळा:यानं
जोडलेल्या खिळ्यांच्या साह्यानं छापलेली होती.
तरीही शिळाछपाई सुरू च होती. अमेरिक न मिशन
प्रेसमध्ये गणपत कृ ष्णाजी (पाटील) यांनी आणि नंतर
जावजी दादाजी (चौधरी) यांनी मराठी मुद्रणक लेचा
ओनामा रचेर्पयत मराठी गं्रंथ-जीवनात
‘खिळ्यां’ऐवजी ‘शिळां’चंच राज्य होतं.
‘बाळबोधा’पेक्षा ‘मोडी’ लिपी ही पंतोजींना आणि
त्यांच्या शिष्यांना जवळची वाटे. ब्रिटिशांनी मोडी लिपी
मोडीत काढेर्पयत पत्रव्यवहारात काय, सर्व लेखनात
मोडीचंच प्रस्थ होतं. ‘मोडी’ला ‘खिळ्यां’चं अप्रूपच
नव्हतं. तिला शिळाछाप जवळचे वाटत. शिळाछपाईची
मोडीतील पुस्तकं तशी क मीच आहेत. धनुर्धारी
िवरचित ‘मराठय़ांचा पत्रबद्ध इतिहास’ हे मोडी
लिपीतील शिळाछपाईचं पुस्तक पाहिलं क ी ध्यानात
येतं, मोडी लिपीसाठी ‘लेखका’चं अक्षर सुवाच्च
असण्याची आवश्यक ता असे. ते सुडौल आणि सुबक
असलं तर मन प्रसन्न होई; पण एखाद्याचं अक्षर खराब
असेल, तर मोडी काय कामाची? आणि मग
शिळाछपाई काय उपयोगाची? ही उणीव ‘खिळ्यांनी
भरू न काढली. सर्व लेखकांचे अक्षर एक सारखं आणि
सुंदर-सुवाच्च झालं!
सुटे खिळे हातानं गोळा क रत वाक्य रचणा:याला
‘खिळारी’ (काम्पोङिाटर) म्हणत. छपाई झाली क ी
शाई लावलेले खिळे सुटे क रणं आणि नवा मजकू र
हाती येताच त्या सुटय़ा खिळ्यांना एक त्र जुळवणं, हे
खिळा:याचं काम! शाईनं त्यांचे हात काळे होत.
‘बाळबोध’ खिळ्यांना ‘देवनागरी’ म्हणण्याच्या काही
शतकं आधी इंग्रजीत मजकू र जुळवला जाऊ लागला
होता. एवढंच नव्हे, तर आवडी-निवडीप्रमाणो
‘खिळ्यां’चा आकार, वळण, प्रकार बदलला जात
होता. इंग्रजी ‘टाइपां’चे प्रकार हाही स्वतंत्र अभ्यासाचा
विषय आहे. ‘हेल्वेटिका’ नावाच्या वाचक प्रिय
‘टाइपा’च्या निर्मितीमागे कि ती व कोणता विचार
आतार्पयत झाला, यासंबंधीची एक चित्रफि तच
उपलब्ध आहे. गणपत कृ ष्णाजी आणि जावजी
दादाजी व तुकाराम जावजी यांनीही ‘खिळ्यां’च्या
आकार-प्रकारात, तसंच वजन-वळणात प्रयोग के ले.
असं म्हणतात क ी, जावजी दादाजींच्या ‘खिळ्यां’च्या
क वर्ग दर्जात म्हणजे क , का, कि , क ी, कु , कू , कं , क :
यातील प्रत्येक ‘क ’ वेगळा होता. कारण काना-मात्र,
इकार-उकार लावला तरी प्रत्येक ‘क ’चं वजन
एक सारखं असण्याची खबरदारी त्यांनी घेतली होती.
‘निर्णयासागर’च्या सुडौल ‘खिळ्यां’ची वाहवा सर्वत्र
झाली, ती काही उगाच नव्हे!
तर सुटे खिळे, मग यंत्रच्या साह्यानं सुटय़ा
‘खिळ्यां’ना एक त्र आणणारा ‘मोनो-टाईप’ मग
वितळलेल्या शिशातून एक त्र जुळलेली अख्खी
ओळ तयार क रणारा ‘लायनो टाइप’.. अशी
मुद्रणक लेची वाटचाल सुरू असतानाच पृथ्वीतलावर
संगणक अवतरला आणि नवीन महाक्र ांती झाली.
क्षणार्धात ‘खिळ्यांचे’ म्हणजे ‘टाइपांचे’ आकार-
प्रकार बदलता येऊ लागले. वजनाचा सवालच उरला
नाही!
या मुद्रण-क लेच्या प्रवासात ‘टंक लेखन’
क रणा:या यंत्रचंही एक युग येऊ न जातं. या यंत्रच्या
मूळ क ल्पनेवरच ‘मोनो’, ‘लायनो’ यंत्रंचा विकास
झाला. अक्षर खराब असण्याची खंत वाटणा:या कु णा
व्यक्तीनं यांत्रिक पद्धतीनं अक्षर कागदावर
उमटविण्याची क्लृप्ती शोधून काढली आणि या
यंत्रचा जन्म झाला. ािस्तोफ र एल. शोल्स नावाच्या
अमेरिक न क वी-पत्रकारानं 1873 मध्ये तयार
के लेलं ‘लिहिणारं यंत्र’ (द रायटिंग मशीन) सुमारे
वर्षभरात विकायला बाजारात आलं, या शोल्सच्या
आधी अशा प्रकारचं यंत्र बनविण्याचे अनेकांनी प्रयत्न
के ले. अगदी 1714 मध्ये हेन्री मिल नावाच्या
इंग्लिशमननं अल्ल ं13्रा्र्रूं’ ेूंँ्रल्ली 1
ेी3ँ िा1 3ँी ्रेस्र1ी22्रल्लॅ 1
31ंल्ल2ू1्र्रुल्लॅ ा ’ी33ी12 2्रल्लॅ’8 1
स्र1ॅ1ी22्र5ी’8 ल्ली ां3ी1 ंल्ल3ँी1 अशी
आपल्या यंत्रची व्याख्या क रू न पेटंटही घेतलं होतं.
त्याच्यानंतर जवळजवळ शंभर वर्षानी म्हणजे 18क्8
मध्ये पेलेग्रिनो तुरी नावाच्या इटालियन संशोधकांनं
त्याची अंध मैत्रीण राजक न्या काऊं टेस क रावलिना
फ न्तोनी हिच्यासाठी असं एक लिहिणारं यंत्र तयार
के लं होतं. खरं म्हणजे संपूर्ण 19 व्या शतकात
‘लिहिणारं यंत्र’ तयार क रण्याचे प्रयत्न अनेकांनी
के ल्याचे उल्लेख आहेत. तत्त्वज्ञ नीत्शेला म्हणो, असंच
एक यंत्र त्याच्या आईनं आणि बहिणीनं वाढदिवसाच्या
निमित्तानं दिलं होतं! प्रकाशकाक डे प्रसिद्धीसाठी
आलेलं पहिलं टंक लिखित पुस्तक मार्क ट्वेनचं होतं.
इतक्या संशोधकांनी इक डे प्रयत्न क रू नही
शोल्सचंच नाव ‘टाइप-रायटर’ या यंत्रशी सर्वाधिक
जोडलं गेलं. याचं कारण त्याचा ‘क ी बोर्ड’च आजही
वापरला जात आहे. त्यानं मूळाक्षरांचा जो क्र म
लावला, तो दहएफळ असा होता, त्याच नावानं तो
ओळखलाही गेला आणि जगभरच्या कं पन्यांना त्याचं
महत्त्व पटून तोच क ी-बोर्ड इंग्रजीसाठी स्वीकारला
गेला. शोल्सचा टाइपरायटर बाजारात आला, तो
ब:यापैक ी विक लाही गेला, तरीही घवघवीत यश त्याला
सुरु वातीला मिळालं नाही. त्याच टाइपरायटरची नवी
आवृत्ती ‘शोल्स अँड ग्लिडन टाइपरायटर’ म्हणून
रेमिंग्टन या बंदूक बनवणा:या ‘कं पनीनं’ 1878 मध्ये
बाजारात आणली आणि तेव्हापासून रेमिंग्टन म्हणजे
टाइपरायटर हे समीक रण झालं. रेमिंग्टनच्या या
यशापूर्वी स्मिथ प्रिमिअर, सिअर्स अंडरवूड हर्मेस
सारख्या तब्बल 112 कं पन्यांनी आपापले
टाइपरायटर बाजारात आणले होते.
भारतात गोदरेज कं पनीचा टाइपरायटर सर्वाधिक
लोक प्रिय ठरला. 195क्च्या सुमारास गोदरेजनं
आपलं उत्पादन सुरू के लं. वर्षाकाठी 5क्,क्क्क्
टाइपरायटर विक णा:या कं पनीचं उत्पादन 2क्1क्
मध्ये ‘वर्ड प्रोसेसर’नं इतकं खाली आणलं क ी, ते
8क्क् वर आलं. आता हा टाइपरायटर फ क्त अरेबिक
वगैरे भाषांसाठी तयार होतो.
एका घटनेची नोंद घेणं आवश्यक वाटतं. पहिलं
देवनागरी लिपीचं टंक लेखन यंत्र कोणी तयार के लं?
विष्णू महादेव अत्रे (1906-1981) या जर्मनीत
उच्च शिक्षणासाठी गेलेल्या तरु णानं निर्णयसागरचा
टाइप वापरू न 1929 च्या सुमारास आपल्या
विद्यार्थी-दशेतच रेमिंग्टन कं पनीच्या सहकार्यानं त्यानं
नागरी लेखन यंत्र त्यानं तयार के लं. देवनागरी ‘क ी-
बोर्ड’ तीन ऐवजी चार पाय:यांचा. कारण ‘कॅ पिटल’
अक्षर नसलं, तरी जोडाक्षर असल्यानं र्अध अक्षर
आणि अर्धी ‘बॅक स्पेस, ‘डेड क ी’ असे गुंतागुंतीचे
प्रकार क रावे लागत होते. या लेखन यंत्रचं
औपचारिक उद्घाटन 1929 मध्ये बेळगावी
भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात झालं.
महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे
शुभसंदेश या यंत्रला लाभले. मुंबईच्या बच्छराज
कं पनीनं ही यंत्र विक ली. या ‘नागरी लेखन यंत्र’च्या
क ी- बोर्डचं पेटंट ज्या विष्णू महादेव अत्रे यांच्याक डे
होतं, त्यांनी मात्र मोठमोठय़ा व्यवस्थापक ीय
नोक :या सोडून विनोबाजींच्या भूदान कार्यात स्वत:ला
झोकू न दिलं. तमाम महाराष्ट्रानं त्यांची तीच ओळख
ठेवली!
इंग्रजी अंमलापूर्वी ‘यद्यपि बहुनाधीषे तथापि पठ
पुत्र व्याक रणम्।’ असा उपदेश मुलाला क रणा:या
इंग्रजी अमलात वडील पिढीवर ‘‘काही विशेष शिक ला
नाहीस, तरी निदान टायपिंग शिक , पोटाची खळगी
भरण्याची सोय होईल,’’ असं सांगण्याची वेळ आली.
स्वातंत्र्योत्तर काळाची पन्नास र्वष उलटतात न
उलटतात तोच ‘टाइपरायटर’ अडगळीत टाक ून
त्याचा आधुनिक भावंडाचा संगणकाचा अनुग्रह व्हावा
म्हणून प्रयत्न क रावा लागत आहे. कालाय तस्मै नम:।