मुंबई : वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या भूखंडासंदर्भात दाखल करण्यात आलेला शीर्षक दावा दाखल करण्याचा अधिकार ‘जनरल आॅफीसर इन कमांड’ला (जीओसी) असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने आदर्श सोसायटीने दाखल केलेले नोटीस आॅफ मोशन गुरुवारी फेटाळले.वादग्रस्त आदर्श सोसायटी उभी असलेली जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा करत संरक्षण दलाने उच्च न्यायालयात ‘शीर्षक दावा’ दाखल केला. मात्र हा दावा दाखल करण्याचा अधिकार केवळ डिफेन्स इस्टेट अधिकाऱ्याला असून ‘जनरल आॅफीसर इन कमांड’ला (जीओसी) नसल्याचे म्हणत आदर्श सोसायटीने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. यापूर्वी मे २०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने आदर्शचा दावा फेटाळून लावत जीओसीलाही दावा दाखल करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याविरुद्ध आदर्श सोसायटीने द्विसदस्यीय खंडपीठापुढे नोटीस आॅफ मोशन दाखल केले. गुरुवारी हे नोटीस आॅफ मोशन निकाली काढण्यात आले. (प्रतिनिधी)
‘आदर्श’ची याचिका फेटाळली
By admin | Published: October 14, 2016 2:36 AM