- सुरेश प्रभू
नदीच्या शुद्धीकरणास नदी समर्थ आहे. मात्र आपण सर्वानी या प्रदूषणाचे स्नेत नष्ट केले पाहिजेत. प्रदूषण करणा:या प्रत्येक व्यक्तीला किंवा समूहाला प्रचंड मोठा दंड आकारला पाहिजे. नदीच्या पाण्याची प्रत प्रत्येक तासाला मोजण्यासाठी सेंसर लावले गेले पाहिजेत. ज्या विशिष्ट ठिकाणी प्रदूषणाला सुरुवात होईल तेथे अलर्ट दिला गेला पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शुद्धीकरण अशक्य नाही..
वाहत्या नद्या हे जिवंतपणाचे प्रतीक आहे. नदीच्या पोटात अनेक त:हेच्या जीवनपद्धती आपले जीवन जगत असतात. प्रत्येक नदीच्या पात्रत विविध स्वरूपाची जैविक विविधता असते. या वैविध्यावर आधारित ख:या अर्थाने आजूबाजूच्या परिसरात जिवंतपणा असतो. प्रत्येक नदीत स्वयंशुद्धीकरणाची क्षमता असते. ब:याचदा वाहणारी नदी आपल्या मार्गक्रमणोत अनेक
दूषित पदार्थाना पोटात सामावून घेऊन शुद्धीकरण करून अविरत वाहण्याचे काम करीत असते.
दुर्दैवाने आपण वाहत्या नदीच्या या क्षमतेलाच आव्हान दिले आहे.
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट मला आठवते. एक साधू आंघोळ करून नदीच्या पात्रतून बाहेर येत असता काठावर बसलेली काही टवाळ मुले त्याच्यावर चिखल फेकत. एक प्रकारे ते साधूच्या क्षमतेलाच आव्हान देत असत. पण एका आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेला साधू मुलांनी चिखल फेकताच पुन:पुन्हा आंघोळ करीत असे. शेवटी टोळकी कंटाळली. साधूच्या अशा क्षमतेपेक्षाही अनेक पटीने अधिक क्षमता निसर्गाने नदीला बहाल केली आहे. मात्र या कलियुगात ही टवाळकी अधिक सबळ झालेली दिसतात.
एकीकडे नदीला आई म्हणत तिच्यावर अत्याचार सुरू आहेत. उद्योगक्षेत्रतील मंडळी, शहरातील कोणत्याही प्रकारचा कचरा, प्रातर्विधी, कपडे धुणो (ज्या साबणात अनेक त:हेची रसायने असतात) एव्हढेच काय, मृतदेहही नदीत टाकले जातात. महाराष्ट्र खूप पुढारलेला आहे असे आपण ऐकतो. राज्यातील नद्यांची स्थिती पाहता आपण किती पुढारलेले आहोत याची ‘जाणीव’ लोकांना होते. काही नद्यांशेजारी मोठी कारखानदारी झाली म्हणून ढोल बजावणा:यांना जाणीव असली पाहिजे की साखर कारखान्यांच्या प्रदूषणामुळे राज्यातील नद्यांमध्ये आज गुरांनाही पाणी पिणो अशक्य झाले आहे. त्यामुळे दुर्दैवाने नद्या मृतप्राय होत आहेत. कथेतील साधूला जे जमले ते दुर्दैवाने या काळात नदीला जमत नाही.
नदीचा प्रवाह थांबला की जीवन संपुष्टात येईल. परिणामी त्यावर विसंबून असणारी जैविक विविधता, मानवी जीवन हेदेखील संपुष्टात येईल. आपली संस्कृती अतिशय पुरातन असल्याचा आपणास सार्थ अभिमान आहे. मात्र या संस्कृतीची ओळख ख:या अर्थाने नदीच आहे, हे आपण विसरता कामा नये. ज्याला आपण इंडस व्हॅली संस्कृती म्हणतो तीदेखील इंडस नदीच्या
पात्रवर स्थिरावली होती. सरस्वती नदी लोप पावली आणि त्यावर विसंबून असणारी फार
मोठी संस्कृती नष्ट झाली याचा विसर आपणास पडता कामा नये.
आपल्या देशात वाहणा:या बहुतांश नद्या या आज गटाराच्या स्वरूपात वाहत आहेत. याच नद्यांमुळे आजही कोटय़वधी लोक आपले जीवन जगतात ही वस्तुस्थिती आहे. शेती, उद्योग व सेवाक्षेत्र यांची गोळाबेरीज म्हणजे देशाचे एकंदर उत्पन्न समजले जाते. या सर्व बाबी पाण्यावरच अवलंबून आहेत आणि हे पाणी प्रामुख्याने आपल्याला नद्यांद्वारेच मिळत असते. तलाव, लहान-लहान झरे किंवा आपल्या घराशेजारील विहीर या सर्व गोष्टींना जे पाणी मिळते तेदेखील भूगर्भातून निर्माण झालेल्या झ:यांतूनच. याचेही स्नेत कुठेतरी नदीशी जोडलेले असतात. म्हणून नदी गेली की पाण्याचे अनेक स्नेतही नष्ट होतील. आई गेल्यावर ‘आई तुझी आठवण येते’ म्हणून हंबरडा फोडण्यापेक्षा आजच आईची सेवा करण्याची गरज आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नदी शुद्धीकरणासाठी जो निर्णय दिला व त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या निर्णयांमध्ये गंगा शुद्धीकरणाचा समावेश केला त्याचे सर्वानी खरोखरच स्वागत केले पाहिजे. नदीच्या शुद्धीकरणास नदी समर्थ आहे. मात्र आपण सर्वानी या प्रदूषणाचे स्नेत नष्ट केले पाहिजेत. शहरात मलनिस्सारण करण्याची यंत्रे वाढवली पाहिजेत. उद्योगांनी वापरलेले पाणी हेदेखील कोणत्याही परिस्थितीत ते पिण्यायोग्य होत नाही तोवर नदीच्या पात्रत सोडता कामा नये. प्रदूषण करणा:या प्रत्येक व्यक्तीला किंवा समूहाला प्रचंड मोठा दंड आकारला पाहिजे. जलवाहतूक करणा:या कोणत्याही नौकेला नदीच्या पात्रत प्रदूषण करायला मज्जाव असला पाहिजे. नदीच्या पाण्याची प्रत प्रत्येक तासाला मोजण्यासाठी सेंसर लावले गेले पाहिजेत. ज्या विशिष्ट ठिकाणी प्रदूषणाला सुरुवात होईल तेथे अलर्ट दिला गेला पाहिजे. त्यामुळे अधिक प्रदूषण होण्याची वाट न पाहता तिथेच कारवाई करता येईल. सुदैवानेअशा प्रकारचे तंत्रज्ञान आज जगात उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक ही निश्चितपणो समाजासाठी लाभदायक ठरेल.
(लेखक माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री आहेत.)
(शब्दांकन : रवींद्र राऊळ)
शंकराची निर्मिती प्रदूषित
नदी ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने दैवी शक्तीचे प्रतीक आहे. शंकराला आपण दुष्कृत्याचा नष्टकर्ता मानतो. पण याच शंकराने गंगेची निर्मिती केली हे आपण विसरू शकत नाही. शंकराने त्या वेळी विश्वनिर्माता ब्रrाचे रूप धारण करून गंगेला भूतलावर आणले. पण तेदेखील कदाचित मानवाने या नदीवर केलेल्या आततायी कृत्यासाठीच नसेल ना? आज आपण महाशिवरात्रीला जे जल पितो तेही त्या शंकरावर असणा:या आपल्या भक्तीसाठीच ना? मग ज्या शंकराला आपण देव म्हणून पूजतो त्या गंगा नदीच्या निर्मात्याची नदी प्रदूषित करण्याची भूमिकाही बजावतो त्याचे काय?