यवतमाळ : लोकांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्ता दिली. हा माणूस आपले जीवन बदलवेल म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या पंतप्रधानपदावर बसविले. पण अवघ्या तीन वर्षात मोदींनी सर्वांना भ्रमनिरास केले. सुरतचे व्यापारी आता बिलावर छापू लागलेत, हो गई भूल कमल का फूल. लोक त्रस्त झाले आहेत, सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत, अशा शब्दात राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा मिश्कील समाचार घेतला. ते म्हणाले, आठ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार असल्याचे मला कळले. मला वाटले, भारत-पाकिस्तानचे काहीतरी बिनसले असावे. म्हणून मी रात्री टीव्ही लावला तर हे महाशय म्हणाले, ये जो हजार रुपये का नोट है वो अब कुछही देर मे कागज बन जायेगा! दुसºया दिवशी पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले. तेव्हा त्यांना म्हणालो, मोदीजी कल रात ये आपने क्या किया? तर ते म्हणाले, सब खतम कर दिया! पण नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही टाटा, बिर्ला रांगेत दिसला नाही. जेवढे पैसे बाहेर होते, तेवढेही परत आले. मग काळा पैसा गेला कुठे? नोटाबंदी कमी होती म्हणून या सरकारने जीएसटी लावली. एकच कर लावणार म्हणत, वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळे कर लावले. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत, फवारणीत शेतकरी बळी पडत आहेत. ही स्थिती पाहून अत्यंत दु:ख होते. बीटी कापसावर बोंडअळी का आली, त्यावर उपाय काय याबाबत लवकरच नागपुरात देशभरातील कृषी शास्त्रज्ञ आणि राज्यातील निवडक शेतकºयांची कार्यशाळा घेऊ, असेही पवार म्हणाले.वस्तूवर वेगवेगळे कर-एकच कर लावणार म्हणत, वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळे कर लावले. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
मोदींनी लोकांचा भ्रमनिरास केला, नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:32 AM