शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

त्यांना मोदीही वाचवू शकणार नाहीत!

By admin | Published: October 24, 2015 3:24 AM

वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापले असतानाच ‘गोहत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत,’ अशी इशारावजा धमकी देऊन विश्व हिंदू

नागपूर : वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापले असतानाच ‘गोहत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत,’ अशी इशारावजा धमकी देऊन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. गोहत्या करून कुणीही भारतात राहू शकत नाही. गोहत्या करणाऱ्यांनी या भ्रमात राहू नये की समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना वाचवतील, असे वक्तव्य तोगडिया यांनी शुक्रवारी केले. नागपूरहून दिल्ली येथे परतताना ते पत्रकारांशी बोलत होते. दादरी येथे घडलेली घटना व गोवंश हत्येवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.तोगडिया म्हणाले, मुस्लिमांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करावा व गोहत्या बंदीच्या आदेशाचे पालन करावे. जर कुणी या आदेशाचे पालन न करता हिंदूंच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला उत्तर दिले जाईल. मग हे उत्तर कुणाचे शांत पद्धतीने असेल तर कुणाचे हिंसक असेल. ते उत्तर देणाऱ्यावर अवलंबून असेल. मात्र, अशा प्रकरणांची प्रतिक्रिया उमटेलच एवढे नक्की, असा थेट इशाराही त्यांनी दिला.राममंदिर उभारण्यासाठी कायदा करावाराममंदिर निश्चितच उभारले जाईल, असा दावा करीत तोगडिया म्हणाले, जसे सोमनाथ मंदिर उभारताना सरदार पटेल यांनी कुणाचीही सहमती घेतली नव्हती. न्यायालयाकडे विचारणाही केली नव्हती; देशाच्या कॅबिनेटने निर्णय घेतला होता. आता राम मंदिरासाठी देशाच्या संसदेत कायदा तयार व्हावा. तोच राम मंदिर उभारण्याचा एकमेव मार्ग आहे. भाजपाकडे संसदेत बहुमत आहे. त्यामुळे भाजपाने कायदा बनवून राममंदिर उभारायला हवे, असेही तोगडिया म्हणाले.