मालवण : देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत आहेत. देशाच्या आजवरच्या इतिहासात त्यांच्याइतका स्वस्त पंतप्रधान कुणीही पाहिला नसेल. देशाचा कारभार सोडून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी २५ हून अधिक सभा घेतल्या. अगोदर खोटी स्वप्ने दाखवून देशाची सत्ता मिळविली. मोदी आता महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा मोदींचा डाव आहे. गुजरातचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी धडपडत आहेत. मोदींचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी संपली. या निमित्ताने काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख असलेल्या नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात जाहीर सभा घेत काँग्रेसच्या प्रचाराचा समारोप केला.महाराष्ट्राच्या अस्मितेला हातनरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घातला आहे. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी कारस्थाने सुरु केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता जागी झाली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. यामुळेच मुुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना रिझर्व्ह बँकेची कार्यालये दिल्लीला हलविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यांना ते जमले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कासार्डे येथील सभेवरही राणे यांनी टीका केली. मोदींची अनेक भाषणे मी पाहिलीत. मात्र आजच्या भाषणाची दखल घ्यावी असे मला वाटत नाही असे राणे म्हणाले. मोदींच्या सभेला गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथून माणसे गोळा करण्यात आली होती. सगळी मिळून सभेला २५ हजार माणसे गोळा झाली होती. ती सुद्धा पैसे देऊन गर्दी जमविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)शिवसेनेवर टीकामुख्यमंत्री पदासाठी २५ वर्षांपासूनची युती सेना भाजपाने तोडल्याचे राणे म्हणाले. या दोघांमध्ये एकही व्यक्ती मुख्यमंत्री होण्याच्या लायक नाही. उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली नाही. ते मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहात आहेत. शिवसेनेच्या एकाही खासदारामध्ये साधे ५ मिनिटे मराठीतून भाषण करण्याचे धाडस नाही. विधानसभेला शिवसेनेने दिलेले उमेदवार वैभव नाईक नगरपालिकेमध्ये कधी दोन मिनिटे बोलू शकला नाही. २०० मिली तेल वाटून आमदार बनता येत नाही. त्यासाठी वैचारिक पातळी असावी लागते.
मोदी स्वस्त पंतप्रधान
By admin | Published: October 13, 2014 10:45 PM