मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ भावनेने अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. द्विवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेगाने प्राप्त झालेल्या परवानग्या आणि मिळालेल्या साहाय्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शहर विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. केंद्र सरकारची दोन वर्षांची वाटचाल महाराष्ट्रासाठीही महत्त्वपूर्ण असून राज्याला केंद्राचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. दुष्काळ निवारणासाठी ३ हजार ५० कोटी, शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांसाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची मदत मिळाली. एवढी मदत यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. (विशेष प्रतिनिधी)ही तर ‘अच्छे दिन‘ची दुसरी पुण्यतिथी - चव्हाणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दाखविलेल्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नांची २६ मे ही दुसरी पुण्यतिथी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दोन वर्षांत महागाई कमी करण्याचे आश्वासन हवेत विरले उलट सामान्यांचे जगणे महाग झाले. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष २६ ते ३१ मे दरम्यान आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
‘मोदी सरकारने राज्याला भरभरून दिले’
By admin | Published: May 26, 2016 1:18 AM