पुणे : राफेल खरेदीव्यवहाराची कागदपत्रे गहाळ झाल्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राफेल घोटाळा झाकण्यासाठीच पंतप्रधान मोदींनी ती फाईल जालली असेल, असा आरोप केला.
हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. काल सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते अॅड. प्रशांत भूषण यांना 'द हिंदू'च्या वृत्तांचा आधार घ्यावा लागला. यावरून न्यायालयाने फटकारले असता महाधिवक्त्यांनी संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रेच चोरीला गेल्याची माहिती दिली. यावरून अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा भाजपा घेत आहे. पाकिस्तानवर हवाई हल्ला करण्याचे श्रेयही भाजपाचे नेते लाटत आहेत. किती दहशतवादी मारले गेले हे सांगण्याचे अधिकार वायुसेनेला आहेत. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष एक तर अन्य नेते वेगवेगळा आकडा सांगत फिरत आहेत. त्यांना आकडेवारी जाहीर करण्याच अधिकार आहे का, असा सवालही पवार यांनी विचारला. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेली गाडी घुसलीच कशी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
न्यायालयातील सुनावणीवेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पुराव्यादाखल सादर होणारी कागदपत्रे चोरीची असतील तर त्याबद्दल फौजदारी कारवाई करणे हा स्वतंत्र मुद्दा आहे. मात्र कागदपत्रे चोरीची आहेत, म्हणून त्यांचे पुरावामूल्य कमी होत नाही किंवा न्यायालयाने ती विचारात घेण्यास बाधा येत नाही, असा कायदा आहे. या कागदपत्रांना किती महत्त्व द्यायचे हे न्यायालय ठरवेल, असे महाधिवक्त्यांनाच सुनावले. ती अजिबात पाहू नयेत, हे म्हणणे टोकाचे आहे. प्रकरणाचे सर्व रेकॉर्ड वाचून आम्ही सुनावणीसाठी येतो. त्यामुळे ऐनवेळी नवे कागद सादर करणे अप्रस्तूत आहे, असे म्हणून सरन्यायाधीशांनी प्रशांत भूषण यांना काहीशी नाराजीही ऐकविली.
मोदींवर खटला चालविण्यास पुरेसे पुरावे - राहुल गांधीनवी दिल्ली : राफेल विमाने खरेदी घोटाळाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, राफेल घोटाळ््यात मोदी दोषी असल्याचे सिद्ध करणाºया महत्त्वाच्या फायली संरक्षण खात्याच्या कार्यालयातून चोरीला गेल्या आहेत. हा पुरावे नष्ट करण्याचा व घोटाळ््यावर पांघरूण घालण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. या विमानांच्या खरेदीत मोदी यांच्यामुळेच मोठा भ्रष्टाचार झाला आहे.