शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

हॅट्ट्रिकसाठी मोदींनी निवडले पुन्हा यवतमाळ; दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘चाय पे चर्चा’ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 7:52 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे.

- गजानन चोपडेलाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ साली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून लोकसभेची पहिली इनिंग सुरू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पुन्हा यवतमाळची निवड केली. २०१९ मध्येही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले होते, हे विशेष. बुधवारी पुन्हा त्यांनी यवतमाळातूनच महिला आणि शेतकऱ्यांनाच केंद्रस्थानी ठेवत  विकासाची ‘गॅरंटी’ दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. राज्यातील सर्व जागा काबीज करण्याची रणनीती भाजपने आखली असून, पंतप्रधानांचा यवतमाळ दौरा याचाच एक भाग आहे. २००४ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना यवतमाळात त्यांची प्रचार सभा झाली होती. त्यानंतर दहा वर्षांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांनी २० मार्च २०१४ साली दाभडी या गावात ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यांतील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. याच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी लोकसभेचे रणशिंगही त्यांनी पांढरकवडा येथील महिला बचत गटाच्या मेळाव्यातून फुंकले होते. त्यावेळीदेखील भाजपला मोठा विजय मिळाला आणि ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. मोदींसाठी यवतमाळ दौरा ‘लकी’ ठरला. 

यवतमाळ ‘लकी’लोकसभेची हॅट्ट्रिक साधण्याकरिता ‘विकासाची गॅरंटी’ देण्यासाठी मोदींनी यवतमाळचीच निवड केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. पंतप्रधानांच्या भाषणाची सुरुवातही ‘गॅरंटी’ याच शब्दानेच झाली. चाय पे चर्चा झाली तेव्हा जनतेने ३०० जागांवर विजय मिळवून दिला. २०१९ मध्ये ३५० जागा दिल्या आणि आता हीच जनता ‘अब की बार ४०० पार’ केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी