शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

‘मोदी, फडणवीस जवाब द्या...’

By admin | Published: May 22, 2015 11:54 PM

‘माकप’चा धडक मोर्चा : सत्तेवर आल्यानंतर सामान्यांसाठी केले काय ?

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची सत्तेवर आल्यानंतर काय पूर्तता केली? याची विचारणा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘मोदी, फडणवीस जबाब द्या...!’ असा धडक मोर्चा काढून भाजप सरकारला इशारा दिला. दाभोलकर, पानसरे यांच्या खुन्यांना कधी अटक करणार?, कोल्हापूरचा टोल कधी रद्द करणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.दसरा चौकात सकाळी अकरापासून आंदोलक जमत होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये ऊस तोडणी कामगार संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटनेसह पक्षाशी संलग्न अन्य संघटनांचाही समावेश होता.पक्षाचे राज्य समिती सदस्य चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, जिल्हा समिती सदस्य डॉ. उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही मोर्चात आंदोलकांची विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. पक्षाचे झेंडे आणि संलग्न संघटनांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.‘भाजप सरकारचा धिक्कार असो...’, ‘मोदी, फडणवीस सत्तेवर आल्यानंतर केले काय?...’अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या मार्गावरून बालगोपाल तालीम परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थितांसमोर मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर समारोप झाला.निवेदनातील मागण्या अशा, एक वर्ष झाले किती काळा पैसा परत आणला, गरिबांसाठी महागाई कमी का केली नाही, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कधी अटक करणार, देवेंद्र फडणवीस यांनी उचगावच्या सभेत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा सरकार कधी पूर्ण करणार?डिझेल, पेट्रोल भाव दररोज का वाढत आहेत, रेशनचं धान्य बंद करून आमचा जगायचा हक्कही काढून का घेता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, औषध महाग केलं जगायचं कसं, तरुणांना रोजगार केव्हा देणार, नगरपालिका, महापालिका, राज्य सरकारचा कर गोळा करायचा अधिकार काढून फक्त केंद्राच्या हातात का देत आहात, महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कायदेशीर आरक्षण का काढून घेतले, गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा करून कोणत्या जातीला खूश करता आहात, यंत्रमाग कामगारांना किमान वेतन का देत नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर का देत नाही, शेतमजुरांचे महामंडळ केव्हा स्थापन होणार, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, आनंदराव चव्हाण, प्राचार्य ए. बी. पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष निकम, अप्पा परीट, जयंत बलुगडे, विकास पाटील, चंद्रकला मगदूम, शिवाजी मगदूम, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)