शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 1:30 PM

भाजपवाले मोदींना विष्णूचा ११ वा अवतार सांगतात, हनुमानाची जात काढतात...

ठळक मुद्देकाँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सभा

पुणे : सहा वर्षांपूर्वी मी जे बोलायला नको होतं ते अनावधानाने बोलून गेलो.. त्याची माफी मागितली, प्रायश्चित्त घेतलं, आत्मक्लेश सुध्दा करुन घेतला..  पुन्हा कुठं चुकलो का .. ? इतिहासातून शिकलो ना..पण ते वाक्याचा अजूनही संदर्भ दिला जातो.. पण  तुमचे नेते शेतकऱ्यांच्या मुलांना लावरिस, साले म्हणतात , तसेच मुली पळविण्याचा सल्ला देतात , हुनमानाची जात देखील काढतात... त्याची लाज वाटत नाही का..? त्याचं काय,  त्यांना तसे बोलण्याचा अधिकार कुणी दिला असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना केला.. पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी या वेळी, काँग्रेसचे उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, अंकुश काकडे, सुप्रिया सुळे , कुमार सप्तर्षी यांच्यासह राष्ट्रवादी , काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. पवार म्हणाले, भौजपाला त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. या सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला असून असे वक्तव्य करुन ते जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी देशाच्या कुटुंबाबद्द्ल बोलण्याएैवजी पवार कुटुंबियांबद्दल बोलत आहे. ते मी , माझी बहीण पाहून घेऊ असेही त्यांनी सांगत मोदींना लक्ष केले . तसेच २५ वर्ष शिवसेना सडली होती पण आता त्यांची सटकली आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केली.आघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या सभेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, शिवसेना 25 वर्ष सडली होती. भाजपला नालायक सरकार, अफजलखान म्हणणारे आता कुठे गेले.त्यांना काहीही व्हिजन नाही, विकास नाही. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही. मतं मागायला जातात. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे.पण तुम्हाला फक्त निवडणुका दिसतात का? मतं मागण्याआधी आम्ही दुष्काळ प्रश्नाला अग्रक्रम दिला. 45 वर्षात एवढी बेरोजगारी वाढली नव्हती.सरकारला बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही .वर्ध्याच्या सभेत आल्यावर आम्हाला अपेक्षा होती की मोदी, 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनावर बोलतील. देशाच्या कुटुंबियांबाबत  बोलण्याची गरज असताना पंतप्रधानांना पवार कुटुंबियांवर बोलण्याचे कारण काय होते?आश्वासनांचे हातभार गाजर काढलंय. आता गाजर पण लाजायला लागले.  तसेच भाजपमधील अडवाणी , मुरली मनोहर जोशी यांचीपरिस्थिती काय झाली हे सर्वजण पाहतच आहोत..  

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवार