शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

'मोदींनी बहिणींसाठी राखीची ओवाळणी दिली', सिलेंडरची किंमत कमी होताच फडणवीसांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 7:57 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधानांचे आभारही मानले.

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (29 ऑगस्ट) घरगुती एलपीजी गॅस (LPG gas) सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, उज्जला योजनेच्या लाभार्थ्यांना या निर्णयातून 400 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. राखी पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर देशातील सर्वच बहिणींना मोदी सरकारने ही ओवाळणी दिल्याचं म्हटलं जात आहे. तर, या निर्णयाचा संबंध निवडणुकीशी जोडत काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधानांचे आभारही मानले. ''पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, रक्षाबंधन सणाच्या पवित्र मुहूर्तावर देशातील बहिणींना त्यांना राखीची ओवाळणी दिली आहे. विशेषत: गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी कमी करुन निश्चितच एक दिलासा दिलाय. तसेच, उज्ज्वला योजनेची सबसिडी आता ४०० रुपये असणार आहे. म्हणजेच गरीब भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे,'' असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आणि मोदींचे आभार मानले. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निश्चित सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेला याचा लाभ मिळणार आहे. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येते. 

LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर

ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गंत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसची टीका

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव होणार याच्या धास्तीने पछाडल्यामुळेच गॅसचे दर कमी केल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, "गेल्या दोन महिन्यांत 'इंडिया' आघाडीच्या दोन बैठका झाल्या आणि आज केंद्र सरकारने LPG गॅसची किंमत 200 रुपयांनी कमी केली. ही आहे इंडिया आघाडीची ताकद.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCylinderगॅस सिलेंडरRaksha Bandhanरक्षाबंधनNarendra Modiनरेंद्र मोदी