राष्ट्रीय बाणा : इंग्रजी अवगत असतानाही हिंदीला प्राधान्य; वाजपेयींनीही केला होता हिंदीचा वापर
नवी दिल्ली : राजनैतिक संभाषणासाठी राष्ट्रीय भाषा हिंदीचा वापर करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. विदेशी नेत्यांशी इंग्रजीतून बोलण्याऐवजी मोदी हिंदीचाच वापर करतील. मोदींना इंग्रजी चांगली येते आणि कळतेही मात्र त्यांनी दिल्लीतील विदेशी राजदूतांशी चर्चा करताना हिंदीचाच वापर केला आहे. त्यावेळी त्यांना भाषा हा अडसर वाटलेला नाही. इंग्रजी चांगली कळत असल्याने मोदींना त्याचे हिंदीत भाषांतर करण्यासाठी दुभाषीची गरज भासणार नाही. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदी बोलणा:यांशी हिंदीतून बोलण्याचा पायंडा पाडला होता, पण इंग्रजी बोलणा:यांशी ते इंग्रजीतून बोलायचे. गरज भासली तर विदेशी दुभाषींचा शोध घेणो अवघड
ठरते. विशेषत: रशियन नेत्यांशी बोलताना वाजपेयींना अडचण येत होती. त्यामुळे भारतीय दुभाषी वाजपेयींचा संदेश स्वतंत्ररीत्या रशियन भाषेत भाषांतरित करीत असत.
जनता पक्षाचे सरकार असताना वाजपेयी यांनी परराष्ट्रमंत्री या नात्याने संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण करून लक्ष वेधले होते. सुषमा स्वराजही वाजपेयी मॉडेलचा अवलंब करणार काय ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांनी आजवरच्या सर्व बैठकींमध्ये इंग्रजीचा वापर केला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री रविवारी त्यांच्याशी चर्चा करणार असून त्याआधी त्या भाषेची निवड करतील असे मानले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चंद्रशेखरही हिंदीतून बोलायचे
4माजी पंतप्रधान चंद्रशेखर भाषणांमध्ये हिंदीचा वापर करीत. द्विपक्षीय बैठकींमध्ये ते इंग्रजीच वापरत; पण हिंदीतून बोलण्याचा पायंडा पडल्यास मोदी हे सर्व बैठकींमध्ये हिंदीचा वापर करणारे पहिले पंतप्रधान ठरतील.
सार्क नेत्यांशी चर्चेत अडचण नव्हती
4श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपाक्षे मोदींची भेट घेताना इंग्रजीतून बोलले मात्र मोदींनी त्यावेळी ते काय बोलत आहेत हे समजण्यासाठी दुभाषींची मदत घेतली नव्हती. मोदी हिंदीतून बोलायचे आणि दुभाषी ते इंग्रजीतून राजपाक्षे यांना सांगायचा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, भारतात शिकलेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करजई यांनी उर्दूचा वापर केला; पण मोदींना ते समजून घेण्यासाठी दुभाषीची गरज भासली नव्हती.