शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

मोदीजी, आमच्या बँकेत १५ लाख कधी जमा होणार? - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 28, 2016 11:16 AM

लोकसभा निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा? असा सवाल एखाद्याने विचारल्यास त्याला काय उत्तर देणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - लोकसभा निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा? असा सवाल एखाद्याने विचारल्यास त्याला काय उत्तर देणार? त्याला मारावे, जाळावे की धरावे? असा खोचक सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला हाणला आहे. केंद्र व राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असणा-या शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडत भाजपा सरकारची तुलना करता 'चायपेक्षा किटली गरम' अशी उपमा दिली आहे. एखादा तिरपागडा सत्य बोलतो म्हणून त्यास मारावे, जाळावे असे बोलणे हे काही आपल्या संस्कृतीत बसत नाही, असा टोमणाही उद्धव यांनी मारला आहे. 
शिवसेना-भाजपामधील छुपे युद्ध काही नवीन नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील धूसफूस वाढली असून भाजपा्या माधव भंडारींनी 'मनोगत'मधून सेनेवर टीका केल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी भंडांरीविरोधात निदर्शने करत मनोगतचे अंकही जाळले. त्यानंतर भाजपा नेतेही गप्प बसले नसून त्यांनी 'सामना' जाळण्याची केलेली भाषा उद्धव ठाकरेंना रुचली नाही. त्यामुळे कालच्या लेखातून शेलारांचा समाचार घेतलेला असतानाच आज त्यांनी पुन्हा भाजपावर तोंडसुख घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात?
-  चायपेक्षा किटली गरम…
मन की बात!
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रउभारणीचे जे कार्य हाती घेतले आहे त्यात काळ्या पैशांची ‘वापसी’ हे महत्त्वाचे काम आहे. सत्तेवर येण्याआधी मोदी यांनी जी वचने दिली त्यातले हे पहिल्या क्रमांकाचे वचन आहे. वचनपूर्तीसाठी पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री जेटली शर्थ करीत आहेत व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आताही आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये दम भरला आहे की, ‘काळा पैसा सप्टेंबरच्या आधी जाहीर करा, अन्यथा परिणामांस तोंड द्या!’ पंतप्रधानांनी काळा पैसा जाहीर करण्याची ही अखेरची संधी दिली आहे. याचाच अर्थ असा की, साप बिळातच आहे व तो बाहेर यायला तयार नाही. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी सांगितले होते की, परदेशी बँकांत दीड-दोन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा दडवून ठेवला आहे. सत्तेवर येताच हा सर्व पैसा परत येईल व गरीबांच्या घराघरांतून सोन्याचा धूर निघेल. प्रत्येक हिंदुस्थानीच्या बँक खात्यावर किमान पंधरा लाख जमा होतील. अशा प्रकारे ‘अच्छे दिन’ चालत येतील, असे श्री. मोदी यांनी मोठ्याच आत्मविश्‍वासाने सांगितल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर मतांचा पाऊस पडला व त्यांची बोट सत्तेच्या किनार्‍याला लागली. दोन वर्षांनंतर नक्की किती काळे धन देशात आले व किती देशवासीयांच्या बँक खात्यांत पंधरा लाख जमा झाले? अशी टीका विरोधक करीत आहेत. या विरोधकांना ‘चोख’ उत्तर देण्यासाठी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनाही रेडिओवर पाठवायला हवे, अशी टीका करणार्‍यांच्या जिभा हासडता येतील काय किंवा त्यांना जाळून मारता येईल काय? तेसुद्धा त्यांना ठरवावे लागेल.
-  मोदी यांनी काळ्या पैशाबाबत जे ‘मिशन’ स्वीकारले आहे ते एक राष्ट्रकार्य आहे. देशाचा पैसा कोणताही ‘कर’ न भरता परदेशात पाठवायचा किंवा करबुडवेगिरी करून दडवून ठेवायचा यालाच काळा पैसा म्हणतात. या काळ्या पैशामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे व हे कोलमडणे फक्त दोन वर्षांतले नाही, गेल्या पन्नासेक वर्षांतले आहे. काळा पैसा फक्त उद्योगपती किंवा सिनेमावाले, दहशतवादी संघटना यांच्याकडेच नाही. काळा पैसा राजकारणातच जास्त खळखळत असतो व तेथेच बूच मारण्याची जास्त आवश्यकता आहे. आपली निवडणूक प्रक्रियाच काळ्या पैशांच्या भ्रष्ट पायावर उभी आहे. राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकांत उद्योगपतींनाच का लॉटरी लागते? व एकमेकांना पाडण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला उद्योगपतीच का लागतात? या प्रश्‍नांच्या उत्तरातच काळ्या पैशाचे स्रोत दडलेले आहेत. हरयाणातील काँग्रेस आमदारांची १४ मते एकाच वेळी बाद होऊ शकतात हा चमत्कार काळ्या पैशांचा आहे. तामीळनाडूसारख्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी पैशांचे वाटप झाले. ते पाहता काळा पैसा शोधण्यासाठी स्वित्झर्लंड किंवा मॉरिशसला पोहोचण्याची गरज नाही. बिहार आणि त्याआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जो पैशांचा पाऊस पडला तो काही आकाशातील इंद्र देवाचा प्रताप नव्हता. राजकीय कुबेरांनीच त्यांच्या लपवलेल्या तिजोर्‍या उघडल्या होत्या. त्यामुळे काळा पैसा आपल्या देशातच आहे. तो उकरून काढला तरी पंतप्रधान मोदी यांचे मिशन सफल होईल.
- स्वदेशातील तुंबलेल्या मोरीला बूच मारले तरी बरेच काही साध्य होईल व मोदी आता नेमके तेच करीत आहेत. मोदी यांनी मनातले भाव व्यक्त केले. त्यांनी स्वदेशातील धनिकांना, व्यापार्‍यांना, राजकारण्यांना आवाहन केले, काळा पैसा बाहेर काढा व पवित्र व्हा! ‘‘मी भाजपच्या खासदारांनाही हाच सल्ला दिला आहे,’’ असेही मोदी यांनी स्पष्ट केले. त्यामागचे भाव समजू शकत नाहीत. मोदी यांची ‘मन की बात’ कडक चायप्रमाणे आहे, पण मुंबईतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या धनावरील ‘मन की बात’ लोकांनी ऐकावी म्हणून ठिकठिकाणी फुकट ‘चाय-पाण्याची’ व्यवस्था केली हेसुद्धा उत्तमच झाले. ‘‘देश बदलत आहे, पण आम्हाला फुकट चहा नको. निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा?’’ असे एखाद्या तिरपागड्याने चहाचा घोट मारताना विचारले तर काय करावे? त्यास मारावे, जाळावे की धरावे असा प्रश्‍न काहींना पडू शकतो. चायपेक्षा किटली गरम म्हणतात ते यालाच! अर्थात आमचे त्या तिरपागड्यांना उत्तर असे आहे की, बाबांनो, पंतप्रधान मोदी ५० वर्षांची घाण साफ करीत आहेत. त्यांच्या हातात छडी जरूर आहे, पण ती जादूची छडी नाही. त्यामुळे फक्त दोन वर्षांत सर्व काही बदलून जाईल ही अपेक्षा ठेवू नका. पंतप्रधान मोदी यांना थोडा वेळ द्या. सर्व काही ठीक होईल. मात्र एखादा तिरपागडा सत्य बोलतो म्हणून त्यास मारावे, जाळावे असे बोलणे हे काही आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे मोदी यांचीच बदनामी होते.