हरीश गुप्ता - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनचा दौरा करणार असल्याचे वृत्त काही इंग्रजी दैनिकांनी प्रकाशित केलेले असले तरी ही माहिती निव्वळ तर्कावर आधारित असल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंग यांनी केला आहे. याबाबत अधिकृत घोषणा होईर्पयत प्रतीक्षा करा, असा सल्ला सिंग यांनी पत्रकारांना दिला.
अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री निशा बिस्वाल या मोदी सरकारसोबत चर्चा सुरू करण्याच्या उद्देशाने आज शुक्रवारपासून भारत दौ:यावर येणार असल्या तरी, दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याकारणाने मोदींच्या अमेरिका दौ:याबाबतचे रहस्य आणि संभ्रम कायम आहे. मोदी सरकारशी चर्चा सुरू करण्यासाठी भारतात येत असलेल्या बिस्वाल या पहिल्याच वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची शक्यता नाही. परंतु परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग आणि इतर अधिका:यांशी मात्र त्या चर्चा करणार आहेत. अमेरिकेने एकदा मोदींना व्हिसा नाकारला होता. या पाश्र्वभूमीवर बिस्वाल यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी मोदी हे दोन दिवसांच्या वॉशिंग्टन भेटीवर जाणार असल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रलय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अथवा परराष्ट्र धोरण सल्लागार यापैकी कुणीही अद्याप दुजोरा दिलेला नाही. 16 मे रोजी ओबामा यांनी मोदींना फोन करून लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी त्यांचे अभिनंदन केले होते आणि त्यावेळी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रणही दिले होते.
सामान्यपणो पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनासाठी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कला भेट देतात आणि सोबतच द्विपक्षीय चर्चेसाठी वॉशिंग्टनचाही प्रवास करतात. मोदींच्या अमेरिका दौ:यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केल्यास त्याचा दोन्हीकडे परिणाम होईल. त्यामुळे या वृत्तावर भाष्य करणो शहाणपणाचे ठरणार नाही, असे पीएमओच्या सूत्रंनी लोकमतला सांगितले.
मोदींना निमंत्रण
मे 2क्14 : भाजपाने ‘न भूतो ना भविष्यती’ असा विजय मिळवित केंद्रात सत्ता स्थापन केली.
याबद्दल मोदी यांचे सर्वात आधी अभिनंदन करणा:यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा, परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांचा समावेश होता.
त्या पाठोपाठ भेट देण्यासाठी अमेरिकेने मोदींना निमंत्रण पाठविले आणि ते मोदींनीही स्वीकारल्याची चर्चा आहे.