मुंबईः भाजपासोबत जाऊन पुन्हा राष्ट्रवादीत आलेल्या अजित पवारांची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद मिळणार का, याचीच उत्कंठा त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्यास अजितदादा पुन्हा वेगळा विचार करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यासंदर्भात सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्या म्हणाल्या, अजितदादांनी कधीही भाजपामध्ये प्रवेश घेतलेला नव्हता. पक्ष आणि कुटुंब ही आमची अंतर्गत बाब आहे. ते पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कायमच माझे मोठे भाऊ राहतील. तसेच काल शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या ऑफरच्या केलेल्या खुलाशावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीला त्यांनी तशी ऑफर दिली हे मोदींचं मोठेपण आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांनी सांगितलं, तसं काहीही झालं नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादी जर शिवसेनेसोबत जाऊ शकते, तर भाजपासोबत का नाही? असा प्रश्न सुप्रिया यांना विचारण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना, सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचं विश्लेषणही केलं.
अजितदादांनी कधीही भाजपामध्ये प्रवेश घेतलेला नव्हता- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 8:52 PM