हरीश गुप्ता - नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रधान सचिव म्हणून काम केलेल्या डॉ. पी. के. मिश्र या आणखी एका ज्येष्ठ आणि विश्वासू सनदी अधिका:यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवरी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नियुक्त केले. डॉ. मिश्र यांच्यासाठी ‘पीएमओ’मध्ये अतिरिक्त प्रधान सचिव असे विशेष पद तयार करण्यात आले असून त्यांच्या नियुक्तीचा कालावधी मोदी पंतप्रधान असेर्पयत असेल.
डॉ. मिश्र हे 1972च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असून गेल्या वर्षी गुजरात वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी गुजरात सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले होते. भुजच्या विनाशकारी भूकंपानंतर गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्यांनी केलेल्या पुनर्वसन व मदत कार्याची जागतिक पातळीवर वाखाणणी झाली होती.
योगायोग असा की पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्र यांची नेमणूक नियमित करण्यासाठी ‘ट्राय’ कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम लोकसभेत मांडण्यात आला त्याच दिवशी डॉ. मिश्र यांची नेमणूक केली गेली आहे. डॉ. मिश्र यांच्या नेमणुकीची चर्चा गेले काही दिवस होती, पण नृपेंद्र मिश्र यांच्या नेमणुकीनंतर ती काहीशी मागे पडली होती. भारतीय उपखंडातील मान्सूनवर अल निनोचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन मोदी यांनी डॉ. मिश्र यांची खास निवड केली असावी, असे मानले जात आहे.
डॉ. मिश्र यांच्या नेमणुकीने ‘पीएमओ’मधील ‘गुजरात क्लब’ची जमवाजमव जवळजवळ पूर्ण झाली आहे. मोदींच्या विश्वासातील व तीन लाख किमीच्या निवडणूक प्रचार दौ:यांमध्ये कायम त्यांच्याबरोबर राहिलेले ओम प्रकाश सिंग, तन्मय मेहता व दिनेश ठक्कर हे गुजरातमध्ये मोंदींसोबत काम केलेले तीन अधिकारी याआधीच ‘पीएमओ‘मध्ये नेमले गेले आहेत. अशा प्रकारे मोदींनी आता आपल्या पसंतीचे अधिकारी नेमून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी केल्याचे दिसते.
-रविवारीच ‘पीएमओ’मध्ये जगदीश ठक्कर यांच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमणुकीस हिरवा कंदील मिळाला होता. पंतप्रधान कार्यालय आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणा:या अधिका:यास या पदनामाने प्रथमच नेमले जात आहे.
-ठक्कर 7क् वर्षाचे आहेत व गेली 13 वर्षे गुजरातमध्ये त्यांनी मोदींसोबत काम केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय माध्यमांशी याआधी फारसा संपर्क नसला तरी ‘साहेबां’ना नेमके काय हवे याची त्यांना अचूक जाण आहे.
4याखेरीज शरद कुमार यांच्या नेतृत्वाखाली पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) निवडक अधिका:यांचा चमू ठक्कर यांच्या सोबत असेल.