पुणे : राफेलच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बाळगलेले मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली आहे, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आनंद शर्मा यांनी केले. सगळा देश मी टू वर बोलत असतानाही मन की बात करणाऱ्या मोदी यांनी आता जन की बात करावी असे आवाहनही शर्मा यांनी केले. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शर्मा म्हणाले, राफेल संबधी मोदी ना संसदेत बोलत आहेत ना जनतेत. सगळीकडे संशय पसरला असताना त्याचे निराकरण करणे हे त्यांचे काम आहे. या व्यवहाराविषयी काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित केलेत. मात्र, मोदी व भाजपा त्याची उत्तरे द्यायला तयार नाहीत. मोदी यांचे या विषयातील मौन ही एकप्रकारे त्यांच्या गुन्ह्याची कबुलीच आहे.देशात मी टू चे वादळ घोंगावत आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यावर काही आरोप झालेत. त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत. ते मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. त्यांनी बोलले पाहिजे. पण मन की बात करणारे मोदी बेटी बचाव वर बोलतात आणि अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मौन बाळगतात. आता त्यांनी मन की बात सोडून जन की बात करावी असे शर्मा म्हणाले.
राफेल संदर्भात मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली : आनंद शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 4:52 PM
सगळा देश मी टू वर बोलत असतानाही मन की बात करणाऱ्या मोदी यांनी आता जन की बात करावी असे आवाहनही आनंद शर्मा यांनी केले.
ठळक मुद्देमी टू वर जन की बात करा