शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोदींच्या ‘कुछ तुफानी करते हैं’मुळे सामान्य उद्ध्वस्त

By admin | Published: February 17, 2017 3:20 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एके दिवशी सकाळी लहर आली आणि चलो कुछ तुफानी करते हैं, म्हणत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय देशावर लादला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एके दिवशी सकाळी लहर आली आणि चलो कुछ तुफानी करते हैं, म्हणत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय देशावर लादला. पंतप्रधानांच्या या तुफानी निर्णयामुळे सामान्य मध्यवर्गीय आणि गरीब मात्र उद्ध्वस्त झाल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो केला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील त्यांच्या रोड शोंना चांगला प्रतिसाद मिळाला. रोड शोदरम्यान शिंदे यांनी चक्क मराठीतून लोकांशी संवाद साधला. मी पक्का मुंबईकर आहे. माझा जन्म मुंबईतलाच. २० वर्षांपासून इथे शिवसेना, भाजपाची अभद्र युती आहे. नद्या स्वच्छ करण्याचे आश्वासन देणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना साधे पिण्याचे पाणी देता येत नाही. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईकरांना चांगले रस्ते देण्यातही भाजपा, शिवसेना अपयशी ठरली आहे. दरम्यान, नागरिकांच्या प्रतिसादामुळे शिंदे यांचा रोड शो लांबला. त्यामुळे नंतरचा मुंबईतील व्यापाऱ्यांसोबतचा चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागला. सध्या भाजपा आणि शिवसेनेत सुरू असलेले वादंग म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे. २० वर्षे भाजपाला महापालिकेतील भ्रष्टाचार दिसला नाही. आता अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आपला सहकारी भ्रष्ट असल्याचा साक्षात्कार झाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी सडकून टीका केली. मोदी यांचे केवळ एकच ध्येय आहे ते म्हणजे ‘दिखाओ सपना और सबका माल करो अपना.’ नोटाबंदी म्हणजे देशातील अतिश्रीमंत वर्गाला पंतप्रधानांनी दिलेली भेटवस्तू आहे. सामान्यांनी कष्टाने मिळवलेला आणि जमा केलेला पैसा एका फटक्यात त्यांनी बाद केला. लोकांना कंगाल करणे म्हणजेच भाजपाचे कॅशलेस धोरण आहे का, असा सवाल शिंदे यांनी केला. (प्रतिनिधी)