शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

मोहाची झाडे ठरत आहेत आदिवासींसाठी कल्पवृक्ष

By admin | Published: April 28, 2016 3:58 AM

मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरिब आदिवासी कुंटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे़ बहुतांश शेतकरी, शेतमजूर शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात.

राहुल वाडेकर,

तलवाडा/विक्रमगड- तलवाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले, औषधी वनस्पती, रानभाज्या तर मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरिब आदिवासी कुंटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे़ बहुतांश शेतकरी, शेतमजूर शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. आदिवासीसाठी फलदायी व उदनिर्वाहाचे साधन बनले आहे ते मोहाचे झाड़ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ या झाडापासुन शेतकऱ्याला लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नविन फुटलेली पालवी उन्हाच्या तीव्र उष्णतेने सुकून जाते़ व गळून पडते त्याचेच पुढे खत होते. प्रसंगी राबासाठी हा पाचोळा वापरला जातो. शेतकरी खरीप हंगामाकरीता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पाला-पाचोळा गोळा करुन शेतात भाजतात़ त्यापासुन शेतात पेरलेल्या भाताच्या रोपटयाला उपयुक्त खत मिळते़ या झाडाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता लागली की ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने ही फुले ४० ते ५० रुपये किलोने विकतात. त्यांचा वापर मद्यनिर्मितीसाठी केला जातो़ ती माफक प्रमाणात घेतल्यास औषधी ठरते, असा आदिवासींचा समज आहे. मोहाच्या झाडाला फळे येतात. या भागात त्यांना दोडें (मोहटया) म्हणून संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासुन स्वादिष्ट भाजी होते .>४आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या फळे जमा करतो़ बिया फोडतो. यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ती सुकवितात़ मोसमात एक व्यक्ती एक क्विंटलच्या आसपास ही दले गोळा करते. ती तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़>४सुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ त्यात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मळ व कडूपणा नष्ट होऊन ते खाण्यालायक होते तर कच्च्या तेलात भिजलेला रुमाल मुलांना थंडी ताप आल्यास त्यांच्या कपाळावर ठेवतात़