सिंचन घोटाळ्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता मलिक, देशमुखांना भेटायला आत जाणार असे ट्विट करू राज्याच्या राजकारणाच खळबळ उडवून देणाऱ्या भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी आता आणखी एक ट्विट केले आहे. याद्वारे त्यांनी रोहित पवारांची बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीवर निशाना साधला आहे.
अजित पवारांनंतर पवार कुटुंबातील दुसऱ्या नेत्यावर निशाना साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. रोहित पवारांच्या अॅग्री आणि सहकारी कारखान्यांबाबत अभ्यास सुरु आहे. रोहित पवारांनी कारखाना खरेदी केल्यावरून ईडीने आधीच तपास सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागची यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.
यावर रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा त्याने ट्विट केले तेव्हाच मी कंबोज यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांने ५२ कोटी रुपये ओव्हरसिज बँकेत घोटाळ्याचा विषय आहे, अजून दोन तीन बँकांना चुना लावला आहे. ज्यांने सामान्य लोकांचा जिथे पैसा असतो, त्या बँकेला चुना लावला असेल त्या व्यक्तीच्या ट्विटला किती महत्व द्यावे हे समजून घ्यावे, असे प्रत्यूत्तर पवारांनी दिले आहे.